
जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा काकडी पहाडी रायता
प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सोशल मीडियावर सतत काहींना काही शेअर करत असतात. त्यांच्या नवनवीन रेसिपी सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ नेहमीच महिलांच्या उपयोगी पडतात. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये काकडीचे सेवन केले जाते. कारण यामध्ये असलेल्या घटकांमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. ज्यामुळे काकडी खाल्यास शरीर कायम हायड्रेट राहते. आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. काकडी खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. काकडीचा वापर करून नेहमीच कोशिंबीर बनवली जाते. पण आज आम्ही तुम्हाला काकडीचा पहाडी रायता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा रायता घरातील लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया काकडीचा पहाडी रायता बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
पंजाबी स्वादाने भरलेला मऊ आणि कुरकुरीत कुलचा; अगदी हॉटेलसारखी चव आता तुमच्या घरी
कृती:
काकडीचा रायता बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
खलबत्यामध्ये मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने जाडसर वाटून घ्या. त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित जाडसर बारीक कुटा.
मोठ्या वाटीमध्ये एक वाटी दही घेऊन त्यात थोडस पाणी घालून दही व्यवस्थित फेटून घ्या. फेटलेल्या दह्यात तयार केलेला मसाला टाकून मिक्स करा.
नंतर त्यात किसललेली किंवा बारीक चिरून घेतलेली काकडी घालून मिक्स करा. तयार आहे काकडी पहाडी रायता.
हा पदार्थ तुम्ही बिर्याणी, जेवणात किंवा पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता.