लहान मुलांच्या नाश्त्यासाठी घरीच बनवा चपाती पॅटीज टॅकोज
सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर भूक लागल्यानंतर लहान मुलांना नेहमीच काहींना काही चटपटीत मसालेदार पदार्थ खाण्यास हवे असतात. नेहमीच मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास हवे असतात. कधी पिझ्झा तर कधी बर्गर खाण्याची इच्छा मुलांना सतत होते. अशावेळी पालकांनी मुलांना बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यास न देता घरी बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावे. कारण नेहमीच बाहेरून विकत आणलेल्या पदार्थांमध्ये अतितेलाचे आणि मसाल्यांचे प्रमाण असते, जे लहान मुलांच्या आरोग्यासाठी योग्य नाही. बाजारात मिळणाऱ्या बर्गर, पिझ्झा आणि इतर पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर मैद्याचा वापर केला जातो. नेहमीच मैदा खाल्यामुळे पोटाचे आरोग्य बिघडून जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चपाती पॅटीज टॅकोज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ १० मिनिटांमध्ये झटपट तयार होतो. याशिवाय कमी तिखट आणि तेलाचे पदार्थ लहान मुलांना नाश्त्यात खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
तोंडाची खराब झालेली चव सुधारण्यासाठी झटपट बनवा आंबटगोड कोकम चटणी, पित्त होईल कमी
दिवसभरात राहाल कायमच उत्साही! सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा Poha Nuggets, नोट करून घ्या रेसिपी