
पदार्थाचे नाव ऐकून लहान मुलं होतील खुश! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिली गार्लिक लच्छा पराठा
प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर त्यांच्या सोशल मीडियावर सतत काहींना काही नवनवीन रेसिपी चाहत्यांसाठी शेअर करत असतात. त्यांच्या रेसिपी अतिशय सोप्या आणि कमीत कमी पदार्थांमध्ये तुम्ही बनवू शकता. जेवणात मुलांना कायमच चपाती, भाकरी किंवा भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चिली गार्लिक लच्छा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांसोबत किंवा चिकन, मटण सोबत सुद्धा खाऊ शकता. लच्छा पराठ्याचे नाव ऐकल्यानंतर मुलांच्या तोंडाला पाणी सुटेल. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा बनवू शकता. कायमच चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर गार्लिक लच्छा अतिशय उत्तम पर्याय आहे. लहान मुलांना लसूण खायला अजिबात आवडत नाही.त्यामुळे लसूण पासून तुम्ही या पद्धतीने कोणताही इतर पदार्थ सुद्धा बनवू शकता. चला तर आणून घेऊया चिली गार्लिक लच्छा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : सकाळचा नाश्ता फक्त चवदारच नाही तर आरोग्यदायीही बनवा; यावेळी ‘नाचणीची इडली’ करून खा!