पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीचा वापर करून बनवा खोबऱ्याचे तेल
भारतासह जगभरात सगळीकडे खोबऱ्याच्या तेलाचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. त्वचा, केस आणि आरोग्याच्या दृष्टीने खोबऱ्याचे तेल अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचा चमकदार आणि मुलायम करण्यासाठी मदत करतात. खोबऱ्याचे तेल बाजारात सहज उपलब्ध होते. या तेलाचा वापर आरोग्यासह जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जातो. दक्षिण भारतासह राज्यातील काही भागांमध्ये खोबऱ्याच्या तेलाचा वापर करून विविध पदार्थ बनवले जातात. प्रत्येक महिन्याला खोबऱ्याच्या तेल घरी विकत आणले जाते. अनेक लोक त्वचा आणि केसांच्या वाढीसाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करतात. या तेलाच्या वापरामुळे त्वचा आणि केस सुंदर राहतात. खोबऱ्याच्या तेलाने त्वचेवर मसाज केल्यास चेहऱ्यावरील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि त्वचा ग्लोइंग दिसते.(फोटो सौजन्य – iStock)
बाजारात खोबऱ्याचे तेल बनवताना केमिकल पदार्थांचा वापर केला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दाक्षिण्यात पद्धतीने खोबऱ्याचे तेल बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीचा वापर करून बनवलेले खोबऱ्याचे तेल दीर्घकाळ चांगले टिकून राहील. तसेच नैसर्गिक पद्धतीचा वापर करून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. दक्षिण भारतासह राज्यातील भागांमध्ये खोबऱ्याचे तेल घरगुती पद्धतीने बनवले जाते. चला तर जाणून घेऊया खोबऱ्याचे तेल बनवण्याची सोपी कृती.
खोबऱ्याचे तेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी, खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे काप मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे तुकडे टाकून बारीक वाटून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार करून घेतलेली पेस्ट कॉटनच्या फडक्यात घेऊन त्यातील नारळाचे दूध काढा. उरलेल्या चोथ्यामध्ये पाणीउ घालून पुन्हा एकदा बारीक वाटून त्यातील नारळाचे दूध काढून घ्या. नारळाचे दूध बंद डब्याच्या झाकणामध्ये ठेवून ४ किंवा ५ तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर नारळाच्या दुधावर जमा झालेली घट्ट सई काढून कढईमध्ये काढून गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर मलाई गरम झाल्यानंतर त्यातून नारळाचे तेल निघेल.
चमकदार आणि मऊ त्वचेसाठी घरच्या घरी ‘या’ पद्धतीमध्ये बनवा तुपाचं मॉइश्चरायझर, त्वचा आतून राहील निरोगी
दक्षिण भारतासह राज्यातील इतर भागांमध्ये खोबऱ्याचे तेल या पद्धतीने बनवले जाते. या तेलाचा वापर करून तुम्ही त्वचा आणि केसांवर मसाज करू शकता. घरगुती पद्धतीचा वापर करून बनवलेले खोबऱ्याचे तेल आरोग्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आहे. खोबऱ्याच्या तेलाचा वापर करून लहान बाळांना सुद्धा मसाज करू शकता.