घरी बनवा सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत कोथिंबीर वडी
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर कोथिंबीर उपलब्ध असते. शिवाय अनेक पालेभाज्यासुद्धा उपलब्ध असतात. कोथिंबीर स्वस्त असल्यामुळे थंडीमध्ये कोथिंबिरीची मोठ्या विक्री केली जाते. तसेच कोथिंबरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. सर्वच घरांमध्ये प्रामुख्याने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी सगळ्यांचं खूप आवडते. जेवणात भाजी नसेल तर कोथिंबीर वडी खाल्ली जाते. पण अनेकदा घरी कोथिंबीर वडी बनवल्यानंतर ती कुरकुरीत होत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बेसनाचा वापर न करता कुरकुरीत कोथिंबीर वडी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने कोथिंबीर वडी केल्यास तुम्ही बनवलेल्या पदार्थाचे घरातील सगळे कौतुक करतील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा