Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॉकलेट प्रेमींसाठी खास! आता घरीच बनवा बेकरी स्टाईल ‘Chocolate Mousse’, चव अशी लहानांसह मोठेही होतील खुश

 Chocolate Mousse Recipe : रिच, क्रीमी आणि तोंडात विरघळणारा चॉकलेट मूस विना ओव्हन घरी तयार करता येतो. खास प्रसंगी किंवा गोड खाण्याची इच्छा झाली की हा सोपा आणि झटपट तयार होणारा डेझर्ट आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 26, 2026 | 03:44 PM
चॉकलेट प्रेमींसाठी खास! आता घरीच बनवा बेकरी स्टाईल 'Chocolate Mousse', चव अशी लहानांसह मोठेही होतील खुश

चॉकलेट प्रेमींसाठी खास! आता घरीच बनवा बेकरी स्टाईल 'Chocolate Mousse', चव अशी लहानांसह मोठेही होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • चॉकलेट खायला कुणाला आवडत नाही.
  • चॉकलेटपासून विविध प्रकार बनवता येतात.
  • आज आपण घरच्या घरी चॉकलेट मूस कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
चॉकलेट प्रेमींसाठी “चॉकलेट मूस” हा एक अतिशय खास आणि रॉयल डेझर्ट मानला जातो. फ्रेंच खाद्यसंस्कृतीतून जगभर लोकप्रिय झालेला हा मऊ, हलका आणि क्रीमी गोड पदार्थ आज प्रत्येक पार्टी, वाढदिवस किंवा खास डिनरसाठी आवडीने बनवला जातो. “मूस” हा शब्द फ्रेंच भाषेतून आला असून त्याचा अर्थ फेसाळ, हलका असा होतो. त्यामुळेच या डेझर्टची टेक्स्चर स्पंजासारखी हलकी आणि तोंडात विरघळणारी असते.

Ramdan Special : इफ्तार पार्टीला घरी बनवा गोड ‘खजुराची खीर’, मेजवानीची चव करेल दुप्पट

पूर्वी हा पदार्थ केवळ हॉटेल्स किंवा बेकरीमध्येच मिळत असे, पण आता घरच्या घरीही अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतो. डार्क चॉकलेटचा हलका कडवटपणा आणि क्रीमची गोड, मखमली चव यांचा सुंदर संगम म्हणजे चॉकलेट मूस. विशेष म्हणजे हा डेझर्ट ओव्हनशिवाय तयार होतो, त्यामुळे नवशिक्यांनाही तो सहज जमतो. पार्टीमध्ये आकर्षक ग्लासमध्ये सर्व्ह केल्यास हा डेझर्ट खूपच उठून दिसतो. वरून चॉकलेट शेव्हिंग्स, ड्रायफ्रूट्स किंवा स्ट्रॉबेरीने सजवले तर त्याची चव आणि सौंदर्य दोन्ही वाढते. चला तर मग, घरीच क्रीमी आणि परफेक्ट चॉकलेट मूस कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया

साहित्य

  • १ कप डार्क चॉकलेट (चिरलेले)
  • १ कप फ्रेश क्रीम (थंड)
  • २ टेबलस्पून पिठीसाखर
  • १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
  • १ टेबलस्पून बटर
पारंपरिक चव आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली थंडगार आंबटगोड सोलकढी आता घरीच बनवा, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम डबल बॉयलर पद्धतीने किंवा मायक्रोवेव्हमध्ये चिरलेले डार्क चॉकलेट आणि बटर एकत्र वितळवून घ्या.
  • मिश्रण गुळगुळीत होईपर्यंत हलवा आणि थोडे थंड होऊ द्या.
  • थंड फ्रेश क्रीममध्ये पिठीसाखर घालून इलेक्ट्रिक बीटरने सॉफ्ट पीक्स येईपर्यंत फेटून घ्या.
  • फेटलेल्या क्रीममध्ये व्हॅनिला इसेन्स घालून हलक्या हाताने मिसळा.
  • थंड झालेले वितळलेले चॉकलेट थोडे थोडे करून क्रीममध्ये घाला आणि फोल्डिंग पद्धतीने हलक्या हाताने मिसळा.
  • तयार मिश्रण सर्व्हिंग ग्लासमध्ये ओता आणि किमान १–२ तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • सेट झालेल्या मूसवर चॉकलेट शेव्हिंग्स, कोको पावडर किंवा फळांचे तुकडे घालून सजवा.
 

Web Title: Special for chocolate lovers make bakery style chocolate mousse at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Chocolate
  • easy food recipes
  • tasty food

संबंधित बातम्या

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी
1

Guava Pickle: साधा वरणभात सुद्धा लागेल चविष्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कच्च्या पेरूचे चटपटीत लोणचं, नोट करा रेसिपी

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या नैैवेद्यासाठी बनवा केळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा
3

Makhana Coconut Barfi: उपवासात गोड खाण्याची इच्छा? साखरेशिवाय बनवा मखाना-खोबऱ्याची पौष्टिक बर्फी; सोपी रेसिपी नोट करा

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी
4

Navratri Fast Recipe: तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे ॲसिडीटी होते? मग नवरात्रीच्या उपवासात खा कच्चा केळीचे पराठे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.