उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे
उपवासाच्या दिवशी प्रामुख्याने साबुदाणा किंवा वरीच्या तांदळापासून बनवलेले पदार्थ खाल्ले जातात. सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या वेळी खाण्यासाठी साबुदाणा खिचडी किंवा वडे बनवले जातात. मात्र नेहमीच साबुदाणा खिचडी किंवा वडे खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्याच होते. याशिवाय उपवासाच्या दिवशी उपाशी पोटी साबुदाणा खाल्यामुळे पचनक्रिया बिघडते. गॅस, अपचन किंवा ऍसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे साबुदाणा खाताना त्यासोबत दह्याचे सेवन करावे. दही खाल्यामुळे साबुदाणा पचन होण्यास मदत होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे जाळीदार आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आप्पे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. साबुदाणा, शेंगदाण्याचं कूट, भगर इत्यादी पौष्टिक पदार्थांपासून तयार केलेले आप्पे चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सकाळच्या नाश्त्यात काकडी आणि ओल्या खोबऱ्यापासून झटपट बनवा मऊसूत डोसा, दिवसाची सुरुवात होईल मस्त
हॉटेल सारखा लच्छा पराठा घरी कसा तयार करायचा? एक एक पदर होईल वेगळा… अवघ्या १५ मिनिटांची रेसिपी