
पिकलेल्या केळींपासून १५ मिनिटांमध्ये झटपट कापसासारखे मऊ चवदार आप्पे, लहान मुलांसाठी गोड पदार्थ
शरीराला पोषण देण्यासाठी आहारात वेगवेगळ्या ताज्या फळांचे सेवन केले जाते. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे केळी. गोड मऊसर केळी लहान मुलांना खूप जास्त आवडतात. नियमित २ किंवा ३ केळी खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच वजन वाढण्यास सुद्धा मदत होईल. केळी खाल्ल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. लवकर भूक लागत नाही. पण बऱ्याचदा केळी विकत आणल्यानंतर ती खूप जास्त पिकतात आणि मऊ होतात. जास्त पिकलेली केळी लहान मुलांना खायला आवडत नाही. अशावेळी प्रश्न पडतो की केळी फेकून द्यावी किंवा खावी? पण केळी फेकून देण्याऐवजी त्यापासून तुम्ही अनेक वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला पिकलेल्या केळींपासून चवदार गोडसर आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही रवा किंवा इडलीच्या पिठापासून बनवलेले आप्पे खाल्ले असतील, पण केळीपासून बनवलेले आप्पे चवीला अतिशय सुंदर लागतात. केळीचे आप्पे बनवताना मैदा किंवा साखरेचा वापर करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यामुळे मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असलेले लोक सुद्धा केळीचे आप्पे सहज खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया केळीचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
वीकेंडला १५ मिनिटांमध्ये बनवा हॉटेल स्टाइल ‘तंदूर पनीर टिक्का’, पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी