
सकाळच्या नाश्त्यात शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून बनवा कुरकुरीत मेदुवडे
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. बऱ्याचदा नाश्त्यासाठी ब्रेड विकत आणले जाते. शिल्लक राहिलेले ब्रेड थोडस कडक झाल्यानंतर कोणीही खात नाही. अशावेळी ब्रेड फेकून दिले जाते. पण शिल्लक राहिलेले ब्रेड फेकून देण्याऐवजी त्यापासून तुम्ही चविष्ट पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून कुरकुरीत मेदुवडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरातील प्रत्येकाला मेदुवडा खायला खूप जास्त आवडतो. मेदुवडा बनवण्यासाठी कायमच तांदूळ आणि उडीद डाळीचे पीठ भिजत घालावे लागते. त्यानंतर भिजवून घेतलेले साहित्य बारीक वाटून नंतर त्यापासून मेदुवडे बनवले जातात. पण कामाच्या धावपळीमध्ये डाळ तांदूळ भिजत घालायचे लक्षात राहत नाही. चला तर जाणून घेऊया ब्रेडपासून मेदुवडे बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)