श्रावण महिन्यातील उपवासाला सकाळच्या नाश्त्यात बनवा कुरकुरीत मेदू वडे
श्रावण महिन्यात केलेले उपवास आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. श्रावणात प्रत्येक दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. तसेच अनेक घरामध्ये पूजा, व्रत इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. श्रावण महिन्यात महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. उपवास केल्यानंतर प्रामुख्याने साबुदाणे किंवा वरीच्या तांदळापासून बनवलेल्या भाताचे सेवन केले जाते. मात्र उपाशी पोटी साबुदाणे खाल्ल्यास पोटात ऍसिडिटी वाढू लागते. त्यामुळे उपवास केल्यानंतर साबुदाणे अजिबात खाऊ नये. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे मेदू वडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मेदू वडे खायला खूप जास्त आवडतात. उपवासाचे मेदू वडे तुम्ही दह्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. यामुळे पदार्थाची चव आणखीनच भारी लागेल.चला तर जाणून घेऊया उपवासाचे मेदू वडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Raksha Bandhan 2025 : मलईदार दुधापासून अवघ्या काही मिनिटांतच घरी बनवा गोडसर अन् चवदार Milk peda