साखर गुळाचा वापर न करता बनवा डिंकाचे लाडू
थंडी सुरु झाल्यानंतर सगळीकडे वातावरणात गारवा असतो. थंडीच्या दिवसांमध्ये अनेक ठिकाणी शेकोटी पेटवली जाते. शिवाय घरामध्ये उबदार कपडे, गरमा गरम जेवण इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. शिवाय अनेक घरांमध्ये थंडी चालू झाल्यानंतर मेथीचे किंवा डिंकाचे लाडू बनवले जातात. हे लाडू आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. कारण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी मेथी आणि डिंकाचे लाडू मदत करतात. मधुमेहापासून ते इतर आजारांनी त्रस्त असलेले लोकसुद्धा डिंकाचे लाडू खाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये डिंकाचे लाडू कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे लाडू तुम्ही साखर किंवा गुळाचा वापर न करता बनवू शकता. नैसर्गीक गोडवा असलेले लाडू बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. चला तर जाणून घेऊया साखर गुळाचा वापर न करता डिंकाचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा