सोप्या पद्धतीमध्ये बनवा रताळ्याचे पॅटिस
सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय बनवायचं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अनेकदा घरी सतत पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी अनेक घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण सतत बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. सकाळच्या घाईगडबडीमध्ये झटपट तयार होईल असा पदार्थ सर्वच महिला शोधत असतात. कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तुम्ही रताळ्याचे पॅटिस बनवू शकता. याआधी तुम्ही उकडलेले रताळे किंवा रताळ्याची खीर खाल्ली असेल पण रताळ्याचे पॅटिस सुद्धा चवीला खूप सुंदर लागतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर रताळे उपलब्ध असतात. शिवाय यामध्ये आढळून येणारे घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे.
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
अनेकांना रताळी खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही त्यांना रताळ्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. रताळ्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे ए, प्रोटीन इत्यादी घटक सुद्धा आढळून येतात. त्यामुळे नाश्त्यात सुद्धा तुम्ही उकडलेले रताळे खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे पॅटिस बनवण्याची सोपी रेसिपी. हे पॅटिस लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप आवडतील.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा