तुपाचे मॉइश्चरायझर बनवण्याची सोपी पद्धत:
वर्षाच्या बाराही महिने त्वचेची योग्य काळजी घ्यावी. प्रत्येक ऋतूंनुसार त्वचेमध्ये सतत काहींना काही बदल होत असतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय कोरडी होते तर उन्हाळ्यात त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते. त्यामुळे बदलत्या ऋतूंनुसार स्किन केअर रुटीनमध्ये सुद्धा बदल करणे आवश्यक आहे. स्किन केअर रुटीनमध्ये बदल करून त्वचेला सूट होणाऱ्या प्रॉडक्टचा वापर करावा. त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंटचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा त्वचेची गुणवत्ता सुधारली जात नाही. त्वचा कोरडी किंवा निस्तेज झाल्यानंतर बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे. त्वचेच्या प्रकाराला सूट होईल असे मॉइश्चरायझर चेहऱ्यावर नियमित लावावे. यामुळे त्वचा हायड्रेट आणि निरोगी राहते. पण अनेक महिला चुकीच्या प्रकारचे मॉइश्चरायझर विकत घेऊन त्वचेची गुणवत्ता खराब करून टाकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुपाचा वापर करून मॉइश्चरायझर बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये मॉइश्चरायझर बनवून त्वचेवर लावल्यास चेहरा अतिशय सुंदर आणि मऊ होईल.
नारळाच्या तेलात असलेले गुणधर्म त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारतात. याशिवाय यामुळे त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा हायड्रेट आणि थंड राहण्यासाठी कोरफड जेल त्वचेवर लावावे. कोरफड जेलमध्ये असलेले गुणधर्म त्वचेमध्ये नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवतात. विटामिन ई मध्ये अँटीऑक्सिडंट त्वचेवर सुरकुत्या कमी करून त्वचा कायम तरुण ठेवण्यासाठी मदत करतात. बाजरात उपलब्ध असलेल्या केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा.