हेअर मास्क लावण्याचे फायदे
सुंदर आणि निरोगी केसांसाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. केसांची वाढ मजबूत होण्यासाठी केसांना तेल लावणे. हेअर मास्क लावणे इत्यादी अनेक उपाय केले जातात. पण काहीवेळा वातावरणातील बदलांमुळे केसांची गुणवत्ता खराब होण्यास सुरुवात होते. कधीही ऊन, वारा, पाऊस असल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन केस कोरडे आणि रुक्ष होऊन जातात. केस कोरडे झाल्यानंतर महिला घरगुती उपाय करण्याऐवजी केमिकल ट्रीटमेंट करण्यास जास्त प्राधान्य देतात. यामुळे केसांची वाढ न होता केस आणखीन खराब होण्याची शक्यता असते.
केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी केसांना आतून पोषण देणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात फळे, भाज्या, पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. आहारात बदल करून बाहेरचे पदार्थ खाण्याऐवजी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे शरीराला आतून पोषण मिळेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या मजबूत वाढीसाठी घरगुती हेअर मास्क कशा पद्धतीने तयार करावा, याची सोपी पद्धत सांगणार आहोत. या पद्धतीने तयार केलेला हेअर मास्क केसांना लावल्यास केस मजबूत आणि मुलायम दिसतील.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: रोज ब्रश करूनही दातांवर साचतोय पिवळा थर? कारण आणि सोपे घरगुती उपाय
हे देखील वाचा: केसगळतीपासून सुटका हवी आहे? मग अवघ्या 10 रुपयांत घरीच तयार करा ‘हे’ आयुर्वेदिक तेल
केसांच्या उत्तम आणि निरोगी वाढीसाठी तुम्ही केसांना आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घरगुती हेअर मास्क लावू शकता. यामुळे तुमच्या केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. केसांच्या वाढीसाठी फ्लॅक्स सीड्स अतिशय प्रभावी आहेत. तसेच कोरफड जेल केसांना लावल्यामुळे केसांमधील, टाळूवरील उष्णता कमी होऊन आराम मिळेल.