Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! ‘या’ पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर, केसांमधील कोंडा होईल कमी

थंडीच्या दिवसांमध्ये केसात वाढलेला कोंडा आणि केसांच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्यांच्या पाण्याचा वापर करावा. यामुळे केस अतिशय चमकदार आणि सुंदर दिसतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 31, 2025 | 10:00 AM
केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! 'या' पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर

केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! 'या' पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर

Follow Us
Close
Follow Us:

हिवाळ्यात महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा केसांच्या समस्या वाढू लागतात. केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, केस गळणे, केसांची वाढ खुंटणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीला महिला दुर्लक्ष करतात, पण कालांतराने समस्या आणखीनच वाढून केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. कोणाचाही सल्ल्याने कोणतेही चुकीचे हेअर केअर प्रॉडक्ट खरेदी केले जातात. याशिवाय केस चमकदार दिसण्यासाठी महागड्या हेअर ट्रीटमेंट, हेअर स्पा याशिवाय हेअर मास्क लावून केसांची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण सतत केमिकल युक्त ट्रीटमेंट केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच महागड्या हेअर केअरचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला मेथी दाण्यांचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)

आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना मिळेल लाल- बर्गंडी रंग

केसांसाठी मेथी दाण्यांचा वापर कसा करावा?

केसांच्या वाढीसाठी मेथी दाण्यांचा वापर केला जातो. मेथी दाण्यांमध्ये असलेले गुणकारी घटक केस अतिशय सुंदर आणि मुलायम करतात. याशिवाय केसांमध्ये वाढलेले कोंडा कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर करावा. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी मेथी दाण्यांच्या पाण्याने केस स्वच्छ करावेत. यामुळे हिवाळ्यात वाढलेल्या केसांच्या समस्या दूर होतील.

मेथीच्या पाण्याचे केसांना होणारे फायदे:

धूळ, माती आणि वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासोबतच केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. जास्त वेळ उन्हात फिरल्यामुळे केस अतिशय कोरडे होऊन जातात. कोरडे झालेले केस खूपच निस्तेज आणि रुक्ष दिसतात. अशावेळी केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मेथी दाण्यांच्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. याशिवाय मेथी दाण्यांचा हेअर मास्क केसांवर लावून काहीवेळ तसाच ठेवावे. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मेथी दाण्यांमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा नष्ट होतो.

वाढत्या थंडीत रोज अंघोळ करावी का? रिसर्चमध्ये करण्यात आला आश्चर्यकारक खुलासा, कारण वाचून व्हाल आनंदी

मेथीचे पाणी कसे वापरावे?

रात्री झोपण्याआधी एक मग पाण्यात दोन चमचे मेथी दाणे भिजत घालावे. रात्रभर मेथी दाणे भिजल्यानंतर सकाळी उठल्यावर मेथी दाणे गाळून घ्या. त्यानंतर पाण्याचा वापर करून केस स्वच्छ धुवा. केस धुवण्यासाठी अतिशय सौम्य शाम्पूचा वापर करावा. यामुळे केस कोरडे होत नाही. वारंवार केस धुवण्यासाठी शाम्पूचा वापर करू नये. याशिवाय आठवड्यातून एकदाच किंवा दोनदाच केस स्वच्छ धुवावे. सतत केस धुतल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल नष्ट होऊन केस कोरडे होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Many hair problems will be permanently solved use fenugreek seeds in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 10:00 AM

Topics:  

  • fenugreek water
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ
1

चेहऱ्यावरील डेड स्किन आठवडाभरात होईल नष्ट! उजळदार त्वचेवर घरीच तयार करा नैसर्गिक स्क्रब, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब
2

चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! १ चमचा तुपाचा वापर करून घरीच तयार करा क्रीम, सुरकुत्या होतील कायमच्या गायब

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब
3

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक
4

चमचाभर बडीशेप केसांवर करेल जादू! कमी खर्चात घरीच तयार करा केमिकल फ्री नॅचरल हेअरडाय, केसांवर येईल चमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.