Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वय वाढलं पण तारुण्य राहिल टिकूण! महागडे प्रोडक्ट विकत आणू नका, घरीच संत्र्याच्या सालीपासून बनवा Anti Aging Serum

How To Make Face Serum : वय वाढू लागलं की चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात आणि त्वचाही सैल होऊ लागते. वाढत्या वयाबरोबरच त्वचेचं तारुण्य जपायचं असेल तर तुम्ही घरीच संत्र्याचा नॅचरल सीरम तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 10, 2026 | 08:15 PM
वय वाढलं पण तारुण्य राहिल टिकूण! महागडे प्रोडक्ट विकत आणू नका, घरीच संत्र्याच्या सालीपासून बनवा Anti Aging Serum

वय वाढलं पण तारुण्य राहिल टिकूण! महागडे प्रोडक्ट विकत आणू नका, घरीच संत्र्याच्या सालीपासून बनवा Anti Aging Serum

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या वयात त्वचेच्या समस्या अधिक वाढू लागतात.
  • बाजारात एंटी एजिंग सीरम फार महागड्या किमतीला विकलं जातं.
  • अशात घरीच तुम्ही नॅचरल सीरम तयार करु शकता.
वय वाढलं की आरोग्याच्या समस्यांसोबतच त्वचेच्या समस्याही वाढू लागतात. आपली त्वचा सुंदर, निस्तेज असावी अशी इच्छा तर प्रत्येकाची असते पण वाढत्या वयात त्वचेची हमी देता येत नाही. वय वाढलं की, त्वचा सैल होऊ लागते ज्यामुळे चेहऱ्याचे साैंदर्य कमी होऊ लागते. आताची धावपळीची जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि प्रदुषणामुळे त्वचेसंबंधित आजार फार सहजपणे आपल्या त्वचेला खराब करु लागतात. वय वाढलं तरी आपलं साैंदर्य कमी होऊ नये अशी इच्छा तर प्रत्येकाच्याच मनात असते. बाजारात त्वचेचे वय कमी करण्यासाठी, निरोगी त्वचेसाठी अनेक महागडे प्रोडक्टस उपलब्ध आहेत. पण या प्रोडक्ट्सना खरेदी करणं प्रत्येकाला परवडण्याजोगं ठरत नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास, सोपा आणि परवडणारा उपाय घेऊन आलो आहोत. याच्या मदतीने तुम्ही घरीच नैसर्गिक आणि परवडणारे फेस सीरम तयार करु शकता.

पुरुषांनो! आयुर्वेदिक विधीने वाढू शकते लैंगिक क्षमता आणि Fertility, तज्ज्ञांनी दिला योग्य सल्ला

संत्र्याचा करा वापर?

हे घरगुती सीरम तुमच्या त्वचेचे साैंदर्य वाढवण्यास तुमची मदत करेल. यासाठी फार काही नाही तर संत्र्याच्या सालीची आपल्याला गरज लागणार आहे. यात व्हिटॅमिन सी असते जे त्वचेला चमकदार, डागविरहित आणि तरुण ठेवण्यासाठी मदत करते. अनेक महिला आपल्या त्वचेचे साैंदर्य वाढवण्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण याऐवजी कोणतेही पैसे खर्च न करता घरीच तयार केलेले संत्र्याचे हे फेस सीरम तुम्हाला सहजतेने तेजस्वी त्वचा मिळवून देण्यास मदत करेल. संत्र्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे केवळ चेहऱ्यावरील डाग कमी करत नाहीत, तर सुरकुत्यांना प्रतिबंध करण्यास आणि त्वचा घट्ट करण्यास देखील मदत करतात.चला हे सीरम घरी कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.

साहित्य

  • संत्र्याची साल
  • गुलाबजल
  • कोरफडीचा गर
  • ग्लिसरीन
  • व्हिटॅमिन ई कॅप्सूल
अँटी-एजिंग सीरम तयार करण्याची पद्धत
  • यासाठी सर्वप्रथम संत्री स्वच्छ धुवुन घ्या. त्याची साल काढून शक्य तितका पांढरा गर यातून वेगळा करा.
  • आता या सालीला कडक उन्हात वाळवा, घाई असल्यास तुम्ही ओव्हनमध्ये गरम करुनही संत्र्याच्या सालीला वाळवू शकता.
  • आता मिक्सरमध्ये या सालीची बारीक पावडर तयार करा.
  • एका भांड्यात एक चमचा संत्र्याची पावडर आणि गुलाबजल मिसळून काही तास हे मिश्रण तसेच राहू द्या.
  • गुलाबजल सालींमधील सर्व व्हिटॅमिन सी शोषून घेईल. आता पातळ कापडाच्या मदतीने यातील सिरम गाळून घ्या.
  • आता तयार सीरममध्ये कोरफडीचा गर आणि ग्लिसरीन मिक्स करा.
  • शेवटी यात व्हिटॅमिन सी सीरम घाला आणि चांगले एकजीव करा.
  • तुमचा नॅचरल फेस सीरम तयार आहे.
स्तन नसूनही का होतो पुरुषांना कॅन्सर, तज्ज्ञांनी सांगितला वाढता धोका; Breast Cancer Risk पुरुषांमध्ये वाढण्याचे कारण

कसे वापरावे

  • तयार सीरम एका गडद काचेच्या बाटलीत ठेवा.
  • हे सीरम बाहेर न ठेवता त्याला नेहमी फ्रिजमध्येच ठेवा.
  • कारण घरगुती सीरममध्ये कोणतेही रसायन नसल्याने ते खराब होण्याची शक्यता असते.
  • रात्री चेहरा धुतल्यानंतर तुम्ही सीरमचे ३-४ थेंब चेहऱ्यावर लावून हळुवारपणे वरच्या दिशेने मसाज करु शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Make homemade anti aging serum using orange peels lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • face tips
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत
1

Blurred Vision: अचानक अंधुक दिसू लागलंय? दुर्लक्ष करू नका; गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

चाळीशीनंतरही चेहरा दिसेल टवटवीत? अँटी-एजिंग क्रीमची गरज नाही! घरच्या घरी बनवा नैसर्गिक कोलाजन क्रीम
2

चाळीशीनंतरही चेहरा दिसेल टवटवीत? अँटी-एजिंग क्रीमची गरज नाही! घरच्या घरी बनवा नैसर्गिक कोलाजन क्रीम

Ear Care: सावधान! कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक
3

Ear Care: सावधान! कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक

Child Health: दप्तरांच्या ओझ्याने वाकली शाळकरी मुलं, मणक्याच्या समस्या; काय सांगतात तज्ज्ञ
4

Child Health: दप्तरांच्या ओझ्याने वाकली शाळकरी मुलं, मणक्याच्या समस्या; काय सांगतात तज्ज्ञ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.