तेच तेच खाऊन कंटाळलात? तर घरी बनवा गावरान स्टाईल पिठलं भाकरीचा बेत; लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच आवडीनं खातील
पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतील एक लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध पदार्थ आहे. हा ग्रामील भागातील अन्नाचा प्रकार असला तरीही शहरातही लोक मोठ्या आवडीने यावर ताव मारतात. फार पूर्वीपासून पिठलं भाकरी बनवले जात आहे. प्राचीन काळापासून विशेषत: जेव्हा अन्नासाठी कमी असे साहित्य असले किंवा भाज्या नसल्या की मग पिठलं भाकरीचा बेत आखला जायचा. हा एक परवडणारा, झटपट आणि पाैष्टीक असा पर्याय मानला जातो.
रायवळी आंब्यांपासून कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा आंबट तिखट आंब्याचा रायता, नोट करून घ्या पदार्थ
आजही लोकं तितक्याच आवडीने या पदार्थाचा आस्वाद घेण्यामागचे कारण म्हणजे त्याची चव! गरमागरम पिठलं आणि त्यासोबत भाकरी यांची जोडी इतकी मजेदार आहे की याला समोर ठेवताच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. ही जोडी आजही खेड्यापाड्यात आवडीने बनवली आणि खाल्ली जाते. वारकरी संप्रदायात वारीच्या काळात पिठलं भाकरी ही एक शक्तिदायक आणि सोपी खुराक आहे. आता एवढी सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही याला चाखायची इच्छा तर झाली असेलच, चला तर मग पिठलं भाकरीची पारंपारीक आणि सोपी अशी रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य
कृती