Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरलेल्या भातापासून तयार करा मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड Tawa Pulao; नोट करा रेसिपी

भाज्या, भात आणि मसाल्यांच्या संगमाने तयार केलेला मसालेदार तवा पुलाव तुमच्या रात्रीच्या जेवणाचा स्टार डिश ठरू शकतो. तुम्ही उरलेल्या शिळ्या भातापासूनही त्याला तयार करू शकता. गरमा गरम भाताची ही चव तुम्हाला खूप आवडेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 14, 2025 | 12:00 PM
उरलेल्या भातापासून तयार करा मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड Tawa Pulao; नोट करा रेसिपी

उरलेल्या भातापासून तयार करा मुंबईचा फेमस स्ट्रीट फूड Tawa Pulao; नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

तवा पुलाव ही एक लोकप्रिय मुंबई स्टाईल स्ट्रीट फूड रेसिपी आहे. ही डिश खास मोठ्या तव्यावर बनवली जाते आणि त्यात भात, भाज्या आणि खास मसाले यांचा भन्नाट संगम असतो. गरमागरम भात, खमंग भाजी आणि पावभाजी मसाला यामुळे या पुलावाला खास चव येते. झटपट तयार होणारी ही रेसिपी लंच किंवा डिनरसाठी अगदी परिपूर्ण आहे.

पावसाळी वातावरणात बाहेरचं खाणं टाळा; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा टेस्टी Ragda Pattice

रात्रीच्या जेवणासाठी काही टेस्टी आणि मसालेदार खाण्याची इच्छा असेल पण फार मेहनत नको असेल तर तवा पुलाव तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चवीने भरलेला हा पुलाव फार झटपट तयार होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो. हा पुलाव ताज्या भातापासून नाही तर उरलेल्या शिळ्या भातापासून तयार केला जातो आणि तसाच चवीला छान लागतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • २ वाट्या शिजवलेला बासमती तांदूळ
  • १ मध्यम कांदा (चिरलेला)
  • १ मध्यम टोमॅटो (चिरलेला)
  • १/२ कप उकडलेला मटार
  • १/२ कप उकडलेली गाजर आणि फुलकोबी
  • १ छोटा चमचा आलं-लसूण पेस्ट
  • २ टेबलस्पून बटर
  • १ टेबलस्पून तेल
  • १ ते १.५ टेबलस्पून पावभाजी मसाला
  • १/२ टिस्पून लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • थोडीशी कोथिंबीर (सजावटीसाठी)
  • लिंबू फोड
१० मिनिटांमध्ये जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा कढीपत्त्याच्या पानांची चविष्ट चटणी, केसांनाही होतील फायदे

कृती:

  • स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव तयार करण्यासाठी सर्वप्रथम मोठ्या तव्यावर तेल आणि बटर गरम करा.
  • त्यात आलं-लसूण पेस्ट घालून सुवास येईपर्यंत परतून घ्या.
  • आता चिरलेला कांदा घालून तो थोडा सोनेरी होईपर्यंत परतवा. त्यानंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा.
  • त्यात पावभाजी मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून नीट मिक्स करा.
  • उकडलेल्या भाज्या (मटार, गाजर, फुलकोबी) घालून २-३ मिनिटे परतवा.
  • शिजवलेला तांदूळ घालून सर्व साहित्य एकत्र करा आणि मंद आचेवर ५-६ मिनिटे परता.
  • वरून कोथिंबीर व लिंबू रस घालून गरम गरम तवा पुलाव सर्व्ह करा.
  • बासमती तांदूळ वापरल्यास पुलाव अधिक चविष्ट लागतो.
  • शिजवलेला तांदूळ पूर्ण थंड झाल्यावर वापरल्यास किंवा शिळा भात पुलाव वापरल्यास पुलाव चिकटत नाही आणि आणखीन छान बनतो.
  • तवा पुलावासोबत दही, रायता किंवा सांडगी मिरची दिल्यास अधिक चविष्ट लागतो.
 

Web Title: Make mumbais famous street food tawa pulao from leftover rice note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 12:00 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • pulao recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
2

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
4

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.