Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : काबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल; एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Falafal Recipe : फालाफल हे लंच, स्नॅक्स किंवा पार्टीसाठी उत्तम डिश ठरते. हे प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन्सने समृद्ध असल्याने हेल्दी स्नॅक म्हणूनही वापरता येते. पार्टी स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 12, 2025 | 10:33 AM
Recipe : कबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल; एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Recipe : कबुली चण्यापासून बनवा पौष्टिक आणि कुरकुरीत फलाफल; एकदा खाल तर पुन्हा बनवाल

Follow Us
Close
Follow Us:
  • फलाफल हा मध्य-पूर्वेकडील पदार्थ आहे ज्यात बॉल्स तयार करून त्यांना तेलात फ्राय केले जाते
  • हा पदार्थ कबुली चण्यांपासून तयार केला जातो
  • चवीला ही डिश फार छान लागते आणि स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय ठरते

मध्यपूर्वेत लोकप्रिय असलेला फालाफल हा एक अतिशय स्वादिष्ट, पौष्टिक आणि कुरकुरीत पदार्थ आहे. मूळतः तो लेबनीज, इस्रायली आणि अरब देशांमध्ये खाल्ला जातो, पण आता जगभरात त्याची लोकप्रियता वाढली आहे. फालाफल हा प्रामुख्याने हरभऱ्याच्या डाळीपासून म्हणजेच चणे (chickpeas) पासून तयार केला जातो. त्यात लसूण, कोथिंबीर, कांदा आणि मसाले यांचा वापर केल्यामुळे त्याला एकदम झणझणीत आणि तोंडाला पाणी आणणारा स्वाद मिळतो.

Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

फालाफल हा केवळ शाकाहारी पदार्थ नसून प्रथिनांनी भरपूर असा हेल्दी पर्यायही आहे. विशेष म्हणजे तो डीप फ्राय किंवा एअर फ्राय करून खाल्ला जातो. त्यासोबत ताहिनी सॉस किंवा हुमस दिला तर त्याची चव दुप्पट वाढते. भारतात सुद्धा आता अनेक कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये फालाफल पिटा ब्रेड किंवा रोलच्या स्वरूपात सर्व्ह केला जातो. जर तुम्हाला काहीतरी वेगळं, झटपट आणि पौष्टिक खायचं असेल तर ही फालाफल रेसिपी नक्की करून बघा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • काबुली चणा (भिजवलेले) – १ कप
  • कांदा – १ मध्यम (चिरलेला)
  • लसूण – ४-५ पाकळ्या
  • कोथिंबीर – ½ कप
  • हिरव्या मिरच्या – २
  • जिरे पूड – १ टीस्पून
  • धणे पूड – १ टीस्पून
  • बेकिंग सोडा – १ चिमूट
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळण्यासाठी

सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश ‘Scarambled Egg’, अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम काबुली चणे ८ ते १० तास पाण्यात भिजवून ठेवा. भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.
  • मिक्सरमध्ये हरभरे, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घालून एक जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट खूप बारीक करू नका.
  • आता या मिश्रणात जिरे पूड, धणे पूड, बेकिंग सोडा आणि मीठ घाला. सर्व घटक चांगले एकत्र करा.
  • हाताला थोडं तेल लावून लहान लहान गोळे तयार करा. तुम्हाला हवे असल्यास त्यांना चपटे आकारही देऊ शकता.
  • कढईत तेल गरम करून हे गोळे मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
  • तळल्यानंतर फालाफल टिश्यू पेपरवर काढा जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल.
  • गरमागरम फालाफल ताहिनी सॉस, हमस किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
  • तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते तुमच्या आवडीच्या सॉससह खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

Web Title: Make nutritious and crunchy falafel from kabuli chana note the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • healthy food
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश ‘Scarambled Egg’, अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी
1

सकाळचा नाश्त्यासाठी बनवा अमीर खानची फेव्हरेट डिश ‘Scarambled Egg’, अभिनेत्याने शेअर केलीये रेसिपी

Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा
2

Winter Recipe : उत्तर भारताची पारंपरिक डिश ‘मटार निमोना’; थंडीच्या दिवसांत नक्की घरी बनवा

Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप
3

Recipe : हिवाळ्यात बाजारात भरपूर रताळे आलेत, जेवणाला यापासून बनवा कुरकुरीत काप

विदेशी पदार्थाला द्या देसी तडका! घरी बनवा चिजी, सॉसी आणि भाज्यांनी भरलेला चविष्ट ‘पिझ्झा’; चव अशी की सर्वच होतील खुश
4

विदेशी पदार्थाला द्या देसी तडका! घरी बनवा चिजी, सॉसी आणि भाज्यांनी भरलेला चविष्ट ‘पिझ्झा’; चव अशी की सर्वच होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.