सकाळच्या नाश्त्यात बनवा पर्पल कॅबेज सॅलेड
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करत असतात. सतत आहारात बदल करणे, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य पाळणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. वजन वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. लठ्ठपणा वाढणे, मधुमेह आणि रक्तदाब वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. उभा समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक आहारात तज्ज्ञांकडून घेतलेला डाईट, जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करणे इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. अशावेळी तुम्ही आहारात पर्पल कॅबेजचे सेवन करू शकता. पर्पल कॅबेज आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: डाळ शिजवताना डाळीवर आलेला फेस आरोग्यासाठी गुणकारी आहे का? जाणून घ्या सविस्तर
पर्पल कॅबेज बाजारात सहज उपलब्ध होते. कोबीच्या भाजीप्रमाणे पर्पल कॅबेजची चव असते. त्यामुळे सॅलड किंवा भाजी बनवून सुद्धा बनवू शकता. या कोबीमध्ये अँटिऑक्सिडेंटचा शक्तिशाली स्रोत असतो, त्यामुळे शरीरसंबंधित अनेक समस्या दूर होतात. लाला रंगाच्या कोबीमध्ये विटामिन सी, ए के जास्त प्रमाणात असतात. शिवाय यामध्ये पॅन्टोथेनिक ऍसिड, पायरीडोक्सिन, थायमिन, राइबोफ्लेविन, नियासिन यांसारखी गुणकारी जीवनसत्व असतात. तसेच या कोबीमध्ये मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जस्त खनिजे, सोडियम आढळून येते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पर्पल कॅबेज सॅलेड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: रोज सकाळी 1 वाटी ओट्स खाल्ल्यास काय होते?