सोप्या पद्धतीमध्य नाश्त्यासाठी बनवा साबुदाण्याचे कस्टर्ड
नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. उत्सवाच्या कालावधीमध्ये सगळीकडे आनंद आणि उत्साह असतो. याशिवाय महिला नऊ दिवस उपवास करतात. उपवासाच्या दिवशी सर्वच घरांमध्ये साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्यांपासून वडे बनवले जातात. पण तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. उपवासाच्या दिवशी उपाशी पोटी साबुदाण्याचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडते आणि आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे उपाशी पोटी चुकूनही साबुदाणे खाऊ नयेत. उपवासाला तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी थंडगार पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये साबुदाण्याचे कस्टर्ड बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. थंडगार दुधात वेगवेगळी फळे, सुका मेवा टाकून तुम्ही कस्टर्ड बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. कमीत कमी वेळात सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही साबुदाण्याचे कस्टर्ड बनवून खाऊ शकता. जाणून घ्या साबुदाणा कस्टर्ड बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा हेल्दी टेस्टी दही कबाब, पारंपरिक चवीचा पौष्टिक पदार्थ
जेवणाची चव वाढवणारी, महाराष्ट्रीयन ताटाची ओळख… कोशिंबीरची सोपी रेसिपी