पारंपरिक पद्धतीत १० मिनिटांमध्ये बनवा आंबट गोड चिंचेचा सार
भारतामध्ये बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. त्यातील अतिशय आवडीचा पदार्थ म्हणजे चिंच सार. आंबट चवीचा चिंचांपासून बनवलेला चविष्ट सार उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये आवडीने प्यायला जातो. लहान मुलांना चिंच खायला खूप जास्त आवडतात. चिंचांचं नाव ऐकल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. आंबट गोड चवीची चिंच आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरतात. उष्ण हवामानात शरीराला थंडावा देण्यासाठी चिंचेचे पेय प्याले जाते. यामध्ये जीवनसत्व सी, लोह, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे शरीराची कमकुवत झालेली पचनक्रिया सुधारते आणि शरीराला अनेक फायदे होतात. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा दूर करण्यासाठी चिंच सार किंवा चिंच कढीचे सेवन करावे. जेवणात गरमागरम वाफाळता भात, चिंच सार आणि भाजलेले सुके मासे असतील तर जेवणाची चव आणखीनच सुंदर लागेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंबट गोड चिंच सार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: Pinterest)