Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाहूनच तोंडाला पाणी सुटेल! घरी बनवा हिरव्या मसाल्यातील कुरकुरीत ‘पापलेट फ्राय’; चविष्ट आणि झटपट रेसिपी

Paplet Fry In Green Masala : हिरव्या मसाल्यात फ्राय केलेला कुरकुरीत पापलेट जेव्हा लिंबाच्या फोडीसह सर्व्ह केला जातो तेव्हा तोंडात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आजच नोट करा याची चवदार रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 23, 2026 | 03:34 PM
पाहूनच तोंडाला पाणी सुटेल! घरी बनवा हिरव्या मसाल्यातील कुरकुरीत 'पापलेट फ्राय'; चविष्ट आणि झटपट रेसिपी

पाहूनच तोंडाला पाणी सुटेल! घरी बनवा हिरव्या मसाल्यातील कुरकुरीत 'पापलेट फ्राय'; चविष्ट आणि झटपट रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • मासेप्रेमींसाठी आजची रेसिपी खास ठरणार आहे.
  • आज आपण जाणून घेणार आहोत पापलेट फ्रायची रेसिपी.
  • विकेंडसाठी ही डिश एक परफेक्ट पर्याय आहे.
समुद्रकिनारी मिळणाऱ्या ताज्या माशाचा सुगंध आणि चव ही खरंच वेगळीच असते. महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात पापलेट हा मासा विशेष लोकप्रिय आहे. त्याच मऊ, रसाळ मांस आणि सौम्य चव यामुळे ती विविध पद्धतींनी बनवली जाते. हिरव्या मसाल्यातील पापलेट फ्राय ही  एक चविष्ट आणि थोडी वेगळी रेसिपी आहे.

Recipe : कुरकुरीत आणि मजेदार… पार्टी स्नॅक्ससाठी एक टेस्टी पर्याय; घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘ओनियन रिंग्स’

कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि लसूण यांचा ताजातवाना मसाला पापलेटला छान झणझणीत आणि सुगंधी बनवतो. या रेसिपीमध्ये मसाल्याची चव आणि मासळीची नैसर्गिक गोडी यांचा सुंदर समतोल साधला जातो. जेवणात काहीतरी खास बनवायचं असेल किंवा पाहुण्यांसाठी आकर्षक डिश हवी असेल, तर हा पापलेट फ्राय नक्की करून पाहावा.

साहित्य:

  • 2 मध्यम आकाराचे पापलेट (स्वच्छ करून काप केलेले)
  • 1 कप कोथिंबीर
  • 1/2 कप पुदिन्याची पाने
  • 3-4 हिरव्या मिरच्या
  • 5-6 लसूण पाकळ्या
  • 1 इंच आले
  • 1 चमचा लिंबाचा रस
  • 1/2 चमचा हळद
  • 1 चमचा लाल तिखट (ऑप्शनल)
  • मीठ चवीनुसार
  • 2-3 चमचे तांदळाचे पीठ किंवा रवा (कोटिंगसाठी)
  • तेल तळण्यासाठी
जेवणात चार घास जातील जास्त! दुपारच्या जेवणात बनवा झणझणीत Stuffed Tomato, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • सर्वप्रथम पापलेट स्वच्छ धुवून त्यावर हलके चिरे द्या, जेणेकरून मसाला आतपर्यंत मुरेल.
  • कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, लसूण, आले आणि थोडंसं पाणी घालून बारीक हिरवा मसाला वाटून घ्या.
  • तयार मसाल्यात हळद, मीठ, लिंबाचा रस आणि लाल तिखट घालून नीट मिसळा.
  • हा मसाला पापलेटच्या दोन्ही बाजूंना आणि चिरांमध्ये चांगला लावा.
  • मासा किमान 20-30 मिनिटं मुरायला ठेवा, त्यामुळे चव अधिक खुलते.
  • मुरलेले पापलेट  तांदळाच्या पीठात किंवा रव्यामध्ये हलकेच घोळवून घ्या.
  • कढईत तेल गरम करून पापलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खमंग होईपर्यंत तळून घ्या.
  • गरमागरम हिरव्या मसाल्यातील पापलेट फ्राय लिंबाच्या फोडीसोबत आणि कांद्याच्या कापांसह सर्व्ह करा. हा
  • पदार्थ साध्या भात-आमटीसोबत किंवा चपातीसोबतही अतिशय छान लागतो.

Web Title: Make tasty pomfret fry in green masala a delicious and quick recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • non veg

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.