सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा टोमॅटो सूप
वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे साथीच्या आजार वाढू लागले आहेत. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर सर्दी, खोकला, अशक्तपणा किंवा थकवा जाणवतो. याशिवाय जुलाब, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम टोमॅटो सूपचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. टोमॅटोमध्ये असलेले आंबटपणा जिभेची चव वाढवतो. चला तर जाणून घेऊया टोमॅटो सूप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
साऊथ इंडियन पद्धतीने घरी बनवा स्वादिष्ट टेस्टी मूगडाळ पायसम, नैसर्गिक गोडवा वाढवणारा पौष्टिक पदार्थ