Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणासुदीसाठी बनवा चविष्ट मखाना खीर, अशी रेसिपी की बोटंही चाटत रहाल

Makhana Kheer Recipe: सणासुदीला वेगळं असं गोड काय बनवायचं असा प्रश्न असेल आणि सतत श्रीखंड, गुलाबजाम अथवा बंगाली स्वीट्स खाऊन कंटाळा आला असेल तर हेल्दी आणि चविष्ट अशी मखाणा खीर तुम्ही नक्कीच घरी बनवू शकता.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 16, 2024 | 08:50 PM
मखाणा खीर रेसिपी

मखाणा खीर रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळीचा सण लवकरच येणार आहे. दिवाळीमध्ये मोतीचूर लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळे यासह घरात रोज काही ना काहीतरी गोडधोड पदार्थ हवे असतात. पेढा, बर्फी, श्रीखंड आणि गुलाबजाम याशिवाय काही विशिष्ट बंगाली मिठाई आपल्या घरात दिवाळीला दिसून येतेच. पण यावेळी दिवाळीला काहीतरी वेगळं बनवायचा विचार असेल आणि पौष्टिक पदार्थ हवा असेल तर तुम्ही मखाणा खीर हा उत्तम पर्याय निवडू शकता. 

अगदी चविष्ट आणि वेगळा स्वाद असणारी ही खीर बोटं चाटत राहण्याइतकी चविष्ट बनवता येते, यासाठी शेफ दीपक गोरे, टाटा संपन्न इन हाऊस कलिनरी शेफ यांनी अगदी सोपी पद्धत आपल्यासह शेअर केली आहे. तुम्हीही अगदी कमी वेळात ही मखाणा खीर रेसिपी करून घरातल्या पाहुण्यांचं मन नक्कीच जिंकू शकता (फोटो सौजन्य – iStock) 

हेदेखील वाचा – कोजागिरी पौर्णिमेला घरी बनवा गोड चविष्ट मखाणा बासुंदी, वाचा सोपी रेसिपी

मखाणा खीरसाठी लागणारे साहित्य

  • 1 टीस्पून तूप
  • 2 ½ कप फुल क्रीम दूध
  • 1/3 कप (120 ग्रॅम) मिल्कमेड (कंडेन्स्ड मिल्क) किंवा 75 ग्रॅम साखर
  • 3 कप टाटा संपन्न उच्च प्रथिने मखाना
  • टाटा हिमालयन केशरच्या काही पट्ट्या
  • 15 ग्रॅम टाटा संपन्न काजू
  • 20 ग्रॅम टाटा संपन्न बदाम
  • चिमूटभर हिरवी वेलची पावडर
  • काजू, बदामाचे तुकडे आणि काळे /हिरवे रेजिन्स- गार्निशसाठी

हेदेखील वाचा – चिरोटे बनवताना पाकळ्या नीट येत नाहीत? मग ‘या’ सोप्या टिप्स वापरून बनवा खुसखुशीत चिरोटे

कशी बनवाल मखाणा खीर

  • प्रीहीटेड पॅनमध्ये 1 टीस्पून तूप घालून टाटा संपन्न हाय प्रोटीन मखाना कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
  • ते थंड करून त्याचे लहान तुकडे करा. पावडर बनवू नका
  • बदाम 1 मिनिट पाण्यात ब्लँच करा, बदामाचे वरील कव्हर काढून घ्या आणि काजूबरोबर थोडे भाजून घ्या त्यानंतर जाडसर अशी पावडर बनवा
  • 2 ½ कप फुल क्रीम दूध एका पॅनमध्ये उकळवा, त्यात मिल्क मेड किंवा साखर घाला आणि चांगले मिसळा
  • तुटलेला मखाना, काजू आणि बदाम पावडर घालून चांगले मिसळा
  • उकळायला ठेवा आणि त्यात केशर, चिमूटभर हिरवी वेलची पावडर घाला, चांगले मिसळा
  • तुमच्या आवडीनुसार दूध आणि साखर घालून कन्सटनन्सी आणि गोडपणा यांचे समायोजन करा
  • काजू, बेदाणे आणि कापलेल्या बदामांनी सजवा. मखाण्याची खीर तुम्ही गरम किंवा थंड दोन्ही पद्धतीने सर्व्ह करू शकता 

टीप – ही रेसिपी आम्ही शेफकडून घेतली असून तुम्ही तुम्हाला हव्या तशा पद्धतीनेही मखाणा खीर बनवू शकता. आपल्या निवडप्रमाणे आणि चवीनुसार साखर आणि अन्य साहित्याचा वापर तुम्हाला करता येऊ शकतो हे लक्षात घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवाळी साजरी करताना मनसोक्त गोड पदार्थ खा पण आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यायला विसरू नका हे मात्र नक्की!

Web Title: Makhana kheer recipe by chef deepak gore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 08:49 PM

Topics:  

  • Diwali
  • food recipe

संबंधित बातम्या

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल
1

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी
2

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मुंबईची स्ट्रीट स्टाईल चविष्ट फ्रँकी, पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी

हॉटेलचं जेवण जाल विसरून, घरी बनवून पहा मसालेदार आणि झणझणीत चवीची चिकन किमा रेसिपी
3

हॉटेलचं जेवण जाल विसरून, घरी बनवून पहा मसालेदार आणि झणझणीत चवीची चिकन किमा रेसिपी

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी
4

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.