कोजागिरी पौर्णिमेला घरी बनवा गोड चविष्ट मखाणा बासुंदी
नवरात्रीच्या तीन किंवा चार दिवसांनंतर कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागिरीच्या दिवशी अनेक ठिकाणी गरबा, दांडियाचे आयोजन केले जाते. तसेच मसाला दूध बनवून अनेक ठिकाणी कोजागिरी साजरी करतात. त्यामुळे यंदाच्या कोजागिरीला तुम्ही सुद्धा घरी मखाणा खीर बनवू शकता. मखाणामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, लोह, जस्त इत्यादी घटक मोठ्या प्रमणावर आढळून येतात. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिने आढळून येतात.मखाणा खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसेच हा पदार्थ पचनास हलका आणि चवीला सुद्धा सुंदर लागतो. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही मखाणाचे सेवन करू शकता.मखाणाचे सेवन केल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. मखाणा बासूंदी कमीत कमी वेळात झटपट तयार होते. चला तर जाणून घेऊया मखाणा बासुंदी बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा मिक्स भाज्यांचे चमचमीत लोणचं, जेवणाची वाढेल चव