सोप्या टिप्स वापरून बनवा खुसखुशीत चिरोटे
श्रावण महिना सुरु झाल्यानंतर सण उत्सवांना सुरुवात होते. सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वच घरांमध्ये गोड पदार्थ बनवले जातात. खीर, बासुंदी, शिरा, तांदुळाची खीर इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. बाजारातून विकत आणलेली मिठाई खाण्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ खावेत. कारण सण उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थ खाऊन आजारी पडण्यापेक्षा घरी बनवलेल्या गोड पदार्थ खावेत.अनेकदा घरी सणाच्या आधल्या दिवशी चिरोटे बनवले जातात. पण चिरोटे करताना पाकळ्या व्यवस्थित आल्या नाहीतर संपूर्ण पदार्थ खराब होऊन जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाजूक पाकळ्यांचे चिरोटे कशा पद्धतीने बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हाडांच्या निरोगी आरोग्यासाठी साखरेचा वापर न करता बनवा पौष्टिक शेंगदाणा लाडू