वॉटर थेरपी करून मलायका अरोरा वयाच्या 51व्या वर्षीही दिसते तरुण, काय आहे ही पद्धत? जाणून घ्या
आपल्या मनमोहक सौंदर्यासाठी आणि फिटनेससाठी सेलिब्रिटीज ओळखले जातात. त्यांचे सौंदर्य पाहून अनेकांना त्यांच्यासारखे बनावेसे वाटते. आता वयोमानानुसार आपले सौंदर्य कमी होऊ लागते किंवा आपल्या त्वचेत काही बदल होऊ लागतात मात्र तुम्ही जर पाहिले असेल तर बहुतेक सेलेब्रिटी हे वय वाढल्यानंतरही पूर्वीप्रमाणेच दिसू लागतात त्याच्या चेहऱ्यात फारसा काही बदल दिसून येत नाही. अनेकांना सेलिब्रिटींच्या या सौंदर्याचे गूढ जाणून घ्यायचे असते.
आपल्या सौंदर्याने लोकांना आश्चर्यचकित करणाऱ्या सेलेब्रिटींमध्ये मलायका अरोराचाही समावेश होतो. आपल्या फिटनेस आणि कधीही न बदलणाऱ्या सौंदर्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. मलायकाच्या सौंदर्याची गुरुकिल्ली आहे ‘वॉटर थेरपी’. वॉटर थेरपीसह ती आपल्या रुटीनमध्ये डाएट, व्यायाम आणि पोर्शन कन्ट्रोलला फार महत्त्व देते.
2 रूपयांच्या या पदार्थाने धडाधड कमी होईल पोटावरची चरबी, आजच करा आहारात समावेश
मलायका रोज घेते वॉटर थेरपी
वॉटर थेरपी हा मालयकाच्या दिनचर्येत एक महत्त्वाचा भाग आहे. मागेच तिने एका मुलाखतीत याबाबत भाष्य केले. यावेळी तिने सांगितले की, ती तिचा दिवस सकाळी 6.30 ते 7 च्या दरम्यान सुरू करते. दररोज ती तिच्या दिवसाची सुरुवात देवाला प्रार्थना करून करते आणि त्यानंतर वॉटर थेरपी सुरू होते. रोज ती साधारणतः 45 मिनिटे ते 1 तास चालते.
काय आहे वॉटर थेरपी?
रिकाम्या पोटी पाणी पिण्याला वॉटर थेरपी असे म्हटले जाते. यामुळे आरोग्य तर चांगलं राहतच शिवाय त्वचेसंबंधीच्या समस्याही दूर होतात. आपले स्वास्थ्य राखण्यासाठी आणि त्वचेला चमकदार बनवण्यासाठी वॉटर थेरपी फायदेशीर मानली जाते. वॉटर थेरपीचा सरळ अर्थ आहे की, सकाळी उठून उपाशीपोटी कोमट पाण्याचे सेवन करा. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर टाकले जातात आणि शरीरातील चयापचय क्रिया सुधारते.
पुरूषहो! कधीही पडणार नाही टक्कल, फक्त असा करा कांद्याचा वापर, रातोरात हेअरफॉल थांबून येतील नवे केस
वॉटर थेरपीमधील समाविष्ट घटक
मालयकाने सांगितले की, सकाळी उठल्यानंतर ती भरपूर पाणी पिते. हे शरीर शुद्ध करण्यास मदत करते आणि यामुळे ती दिवसभर उर्जावान राहते. वॉटर थेरपीनंतर मलायका 1 तास योगासन करते. मालयकाने पुढे सांगितले की, ती पोर्शन कंट्रोलवर विशेष लक्ष देते. तिचा आहार हा नेहमी प्रमाणात असतो. एका ठराविक प्रमाणातच अन्न खाण्याला ती अधिक प्राधान्य देते.
मालयकाने सांगितले की, आहारात कार्बोहायड्रेट्स असणे फार गरजेचे असते, कारण याशिवाय शरीरात थकवा जाणवू शकतो. मात्र कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण हे नेहमी संतुलित असावे. जर लंचमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक झाले असेल तर मग डिनरमध्ये याचे प्रमाण कमी असावे, असे ती म्हटली. मलायका तिच्या फिटनेस थेरपीसाठी चाहत्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. वयाच्या 50 वर्षातही ती एक फिटनेस आयकॉन म्हणून ओळखली जाते.