पुरुषांमधील वंध्यत्व का वाढतंय
वंधत्वाची समस्या महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही वेगाने वाढताना दिसत आहे. या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात, परंतु आता एका नवीन अभ्यासात या समस्येचे प्रमुख कारण सापडले आहे. हा शोध पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसाठी मोठे आव्हान आहे. बदललेली लाईफस्टाईल, खाणंपिणं यासह आता अजून एका महत्त्वाच्या कारणाचा शोध लागल्याचे दिसून आले आहे.
प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने पुरुषांमध्ये वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो, असे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे. या अभ्यासाचे नेतृत्व डेन्मार्कमधील नॉर्ड विद्यापीठातील संशोधकांनी केले. या अभ्यासात 2000 ते 2017 दरम्यान डेन्मार्कमध्ये राहणाऱ्या 526,056 पुरुषांचा समावेश होता. या पुरुषांचे वय 30 ते 45 वर्षांच्या दरम्यान होते आणि त्यापैकी बहुतेकांना दोनपेक्षा कमी मुले होती, जाणून घेऊया अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
अभ्यासात काय आढळले?
हवेतील प्रदूषणामुळे पुरूषांच्या शुक्राणूवर होतोय परिणाम
अभ्यासात असे दिसून आले आहे की जे पुरुष पाच वर्षांपेक्षा जास्त काळ PM2.5 प्रदूषणाच्या सरासरी पातळीपेक्षा जास्त आहेत त्यांना वंध्यत्वाचा धोका 24 टक्के जास्त आहे. PM2.5 हे लहान कण असतात जे प्रदूषणामुळे हवेत पसरतात. हे कण खूप लहान असतात आणि थेट फुफ्फुसात पोहोचू शकतात.
हेदेखील वाचा – पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा
प्रदूषणामुळे वंध्यत्वाचा धोका का वाढतो?
वंध्यत्वाचा धोका कसा वाढतोय
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने शरीरात ऑक्सिडेटिव्ह तणाव वाढू शकतो. ऑक्सिडेटिव्ह तणाव ही अशी स्थिती आहे जेव्हा शरीरात मुक्त रॅडिकल्सची संख्या वाढते. हे मुक्त रॅडिकल्स शुक्राणूंना नुकसान पोहोचवू शकतात आणि त्यांची गुणवत्ता कमी करू शकतात. याशिवाय, प्रदूषणामुळे हार्मोनल संतुलन बिघडू शकते, ज्यामुळे वंध्यत्व येऊ शकते.
या अभ्यासाचे निष्कर्ष काय?
नव्या संशोधनातून नेमके काय निष्कर्ष काढण्यात आले आहेत
या अभ्यासाचे निष्कर्ष अतिशय चिंताजनक आहेत. या अभ्यासात दर्शविल्याप्रमाणे प्रदूषण ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे ज्यामुळे केवळ श्वसनाचे आजारच होत नाहीत तर वंध्यत्वासारख्या पुनरुत्पादक समस्यादेखील होऊ शकतात. प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याची गरज या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा – 100 च्या वेगाने फर्टिलिटी वाढवतील 5 पदार्थ, पुरूषांसाठी ठरतील वरदान
काय करावे?
पुरूष आणि महिलांनी वंधत्व येऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी
हे जरी खरं असलं तरीही महिलांनी आणि पुरुषांनी आपल्या नियमित जगण्यामध्ये बदल करणेदेखील आवश्यक आहे. याशिवाय सिगारेट आणि दारूसारखी व्यसनं कमी करणे आणि आहारात नियमित पौष्टिक पदार्थांचा समावेश करून घेणे गरजेचे आहे. याशिवाय दिवसातून 8 तास झोप ही अत्यावश्यक असून त्यानुसार प्रत्येकाने आपला रोजचा दिवस आखायला हवा.