Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?

‘घालीन लोटांगण’नंतर हातात फुले आणि अक्षता घेऊन ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हटली जाते? या प्रार्थनेमागे केवळ धार्मिक परंपरा नसून वैदिक मंत्रांचा मोठा संदर्भ आहे. विशेष म्हणजे आजची मंत्रपुष्पांजली एकाच ग्रंथातील सलग सूक्त नसून विविध वैदिक ग्रंथांतील मंत्रांचे संकलन असल्याचे सांगितले जाते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 19, 2026 | 08:51 AM
‘घालीन लोटांगन’ नंतर ‘मंत्रपुष्पांजली’ का म्हणावी? मंत्रपुष्पांजलीचा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व?
Follow Us
Follow Us:
  • ‘घालीन लोटांगण’नंतर मंत्रपुष्पांजली म्हणत देवतेला फुले अर्पण करण्याची महाराष्ट्रात प्रचलित परंपरा आहे.
  • मंत्रपुष्पांजलीतील मंत्र विविध वैदिक ग्रंथांशी संबंधित असून त्यातून कल्याण आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते.
  • हातातील पुष्प देवाला अर्पण करताना भक्ती, कृतज्ञता आणि समर्पणाचा भाव व्यक्त करण्याला विशेष महत्त्व दिले जाते.
आता गणपतीचा सीजन चालू आहे. रोजच्या रोज सकाळ संध्याकाळची आरती झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये ‘घालीन लोटांगण’ म्हटले जाते. त्यानंतर हातात फुले-अक्षता घेऊन ‘मंत्रपुष्पांजली’ म्हटली जाते. ही परंपरा केवळ पाठांतरापुरती मर्यादित नसून पूजा पूर्णत्वास नेण्यामागे तिचा विशेष भावार्थ आहे. मंत्रपुष्पांजलीच्या माध्यमातून देवतेला पुष्प अर्पण करत भक्त कृतज्ञता आणि प्रार्थनेची भावना व्यक्त करतो.

मंत्रपुष्पांजली म्हणजे काय?

‘मंत्रपुष्पांजली’ हा शब्द ‘मंत्र’, ‘पुष्प’ आणि ‘अंजली’ या तीन शब्दांपासून तयार होतो. मंत्र म्हणजे पवित्र वैदिक उच्चार, पुष्प म्हणजे फूल आणि अंजली म्हणजे दोन्ही हात जोडून किंवा ओंजळीत अर्पण करणे. त्यामुळे मंत्र म्हणत देवतेला फुले अर्पण करणे, असा याचा साधा अर्थ सांगता येतो.

आरतीनंतर म्हणाल्या जाणाऱ्या ‘घालीन लोटांगन’चा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व? आणि का म्हटले जाते आरतीच्या शेवटी?

यात नेमके काय म्हटले जाते?

मंत्रपुष्पांजलीतील सुरुवातीचा प्रसिद्ध मंत्र ‘यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः’ हा ऋग्वेदातील पुरुषसूक्ताशी संबंधित आहे. त्यात देवांनी यज्ञाद्वारे यज्ञस्वरूप परमेश्वराची उपासना केल्याचा भाव व्यक्त होतो. पुढे ‘राजाधिराजाय प्रसह्यसाहिने’ या मंत्रातून वैश्रवण म्हणजे कुबेराला नमस्कार आणि कल्याणाची प्रार्थना केली जाते. त्यामुळे मंत्रपुष्पांजलीमध्ये केवळ एका देवतेची स्तुती नसून वैदिक प्रार्थनांचा व्यापक भाव दिसतो.

मग ‘घालीन लोटांगण’नंतरच का?

‘घालीन लोटांगण’मध्ये भक्त देवाच्या चरणी नम्रतेने शरण जाण्याचा भाव व्यक्त करतो. त्यानंतर मंत्रपुष्पांजलीत हातातील पुष्प-अक्षता देवाला अर्पण करून प्रार्थना केली जाते. काही पूजापद्धतींमध्ये मंत्रपुष्पांजलीला पूजेतील अंतिम उपचारांपैकी एक मानले जाते. त्यामुळे आधी भक्ती आणि समर्पण व्यक्त करून, त्यानंतर प्रत्यक्ष पुष्प अर्पण करण्याची ही क्रमवार पद्धत तयार झाली आहे.

सुखकर्ता दुखहर्ता आरतीचा अर्थ; गणपती बाप्पाच्या प्रत्येक ओळीत दडलेला खास संदेश जाणून घ्या

मंत्रपुष्पांजलीचे महत्त्व काय?

मंत्रपुष्पांजलीचा केंद्रबिंदू म्हणजे अर्पण आणि प्रार्थना. हातातील फूल हे श्रद्धेचे प्रतीक मानून ते देवाच्या चरणी वाहिले जाते. वैदिक मंत्रांमध्ये धर्म, कल्याण, समृद्धी आणि सुशासनाशी संबंधित प्रार्थनांचे संदर्भ आढळतात. त्यामुळे ही प्रार्थना वैयक्तिक इच्छा व्यक्त करण्याबरोबरच व्यापक कल्याणाची भावनाही समोर आणते.

ही एकच वैदिक रचना आहे का?

एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज प्रचलित असलेली मंत्रपुष्पांजली ही एक सलग सूक्त नसून विविध ग्रंथांतील मंत्रांचे संकलन आहे. संदर्भांनुसार त्यातील मंत्र ऋग्वेद, तैत्तिरीय आरण्यक आणि ऐतरेय ब्राह्मण यांसारख्या वैदिक ग्रंथांशी संबंधित आहेत. म्हणून आरतीनंतर म्हटली जाणारी ही प्रार्थना भक्ती, वैदिक परंपरा आणि अर्पणभाव यांचा सुंदर संगम मानता येतो.

 

Web Title: Mantra pushpanjali meaning importance after ghalin lotangan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2026
  • Ganeshotsav
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

आरतीनंतर म्हणाल्या जाणाऱ्या ‘घालीन लोटांगन’चा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व? आणि का म्हटले जाते आरतीच्या शेवटी?
1

आरतीनंतर म्हणाल्या जाणाऱ्या ‘घालीन लोटांगन’चा अर्थ काय? काय आहे याचे महत्त्व? आणि का म्हटले जाते आरतीच्या शेवटी?

सुखकर्ता दुखहर्ता आरतीचा अर्थ; गणपती बाप्पाच्या प्रत्येक ओळीत दडलेला खास संदेश जाणून घ्या
2

सुखकर्ता दुखहर्ता आरतीचा अर्थ; गणपती बाप्पाच्या प्रत्येक ओळीत दडलेला खास संदेश जाणून घ्या

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
3

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

गणेशोत्सवात Instamart चे ट्रेंड्स; Eco Friendly गणपतींच्या मागणीत 176% तर मावा मोदकांमध्ये 145% वाढ!
4

गणेशोत्सवात Instamart चे ट्रेंड्स; Eco Friendly गणपतींच्या मागणीत 176% तर मावा मोदकांमध्ये 145% वाढ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.