Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुखकर्ता दुखहर्ता आरतीचा अर्थ; गणपती बाप्पाच्या प्रत्येक ओळीत दडलेला खास संदेश जाणून घ्या

‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही गणपतीची लोकप्रिय मराठी आरती असून, परंपरेने ती समर्थ रामदास स्वामींची रचना मानली जाते. आरतीमध्ये गणपतीला सुख देणारा, दुःख आणि विघ्ने दूर करणारा देव म्हणून वर्णन केले आहे. त्याच्या रूपातील शेंदूर, मोत्यांची माळ, मुकुट आणि आभूषणांचेही सुंदर वर्णन केले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 18, 2026 | 09:21 PM
सुखकर्ता दुखहर्ता आरतीचा अर्थ; गणपती बाप्पाच्या प्रत्येक ओळीत दडलेला खास संदेश जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • सुखकर्ता दुखहर्ता आरतीमध्ये गणपतीला सुख देणारा आणि दुःख दूर करणारा विघ्नहर्ता मानले आहे.
  • आरतीतील पुढील ओळींमध्ये गणरायाचे शेंदूर, मोत्यांची माळ आणि अलंकारांनी सजलेले रूप वर्णिले आहे.
  • शेवटी संकटाच्या वेळी गणपतीने भक्तांचे रक्षण करावे, अशी मनापासून प्रार्थना केली आहे.
महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव पार पाडला जात आहे. आणि मराठी कुटुंबात प्रत्येक ठिकाणी श्री गणपतीची ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती सगळीकडे सर्रास म्हटली जाते. महाराष्ट्रातील गणपती आरती परंपरेतील अत्यंत लोकप्रिय आरती आहे. ही आरती परंपरेने समर्थ रामदास स्वामींची रचना मानली जाते. गणरायाचे रूप, त्याचे गुण आणि भक्तांवरील कृपा यांचे सुंदर वर्णन या आरतीत केले आहे. त्यामुळे केवळ आरती म्हणण्यापेक्षा तिचा अर्थ समजून घेतल्यास भक्तीभाव अधिक जिवंत होतो.चला तर आज जाणून घेऊयात या आरतीचा स्पष्ट आणि भावपूर्ण अर्थ,

पहिल्या कडव्याचा अर्थ

‘सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नाची’ या ओळीत गणपतीला सुख देणारा आणि दुःख दूर करणारा देव म्हणून संबोधले आहे. भक्तांच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर करणाऱ्या विघ्नहर्त्या स्वरूपाची येथे आठवण करून दिली आहे.

‘नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची’ यामध्ये गणराय भक्तांवर प्रेम आणि कृपा करणारा आहे, अशी भावना व्यक्त होते. त्याच्या आशीर्वादामुळे भक्तांना मानसिक आधार आणि आत्मविश्वास मिळतो, असा भक्तीपर अर्थ या ओळीतून दिसतो.

‘सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची’ या ओळीत गणपतीच्या सुंदर स्वरूपाचे वर्णन आहे. त्याच्या अंगावर लावलेल्या शेंदुरामुळे त्याचे रूप अधिक मंगल आणि आकर्षक दिसते, अशी कल्पना मांडली आहे.

‘कंठी झळके माळ मुक्ताफळांची’ म्हणजे गणरायाच्या गळ्यात मोत्यांची सुंदर माळ शोभून दिसत आहे. या ओळीत त्याच्या अलंकारिक आणि प्रसन्न रूपाचे चित्र उभे केले आहे.

Gauri Puja 2026: गौरी पूजनाचा इतिहास आणि परंपरा; महाराष्ट्रात कसा साजरा केला जातो हा उत्सव

‘जय देव जय देव’चा भावार्थ

या भागात गणपतीला मंगलमूर्ती म्हणजेच शुभत्वाचे प्रतीक मानून त्याचा जयजयकार केला आहे. ‘दर्शनमात्रे मनकामना पुरती’ या भावनेत गणरायाचे दर्शन भक्ताच्या मनातील इच्छा आणि श्रद्धेला समाधान देणारे असल्याचे सांगितले आहे.

दुसऱ्या कडव्यातील गणरायाचे रूप

रत्नखचित फरा तुझ गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुमकुमकेसरा॥
हिरेजडित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नुप्रे चरणी घागरिया

या ओळींमध्ये गणपतीला गौरीचा पुत्र म्हणून संबोधत त्याच्या मस्तकावरील रत्नजडित मुकुट, चंदन-कुंकवाचा लेप आणि चरणांतील नूपुर यांचे वर्णन केले आहे. म्हणजेच गणरायाचे दिव्य, राजस आणि प्रसन्न रूप भक्तांसमोर उभे केले आहे.

Ganesh Story: श्रीगणेशांना एकदंत नाव कसे मिळाले? जाणून घ्या परशुराम आणि गणपतीच्या युद्धाची कथा

शेवटच्या कडव्याचा अर्थ

लंबोदर पीतांबर फणीवर वंदना।
सरळ वक्र तूंड त्रिनयना॥
दास रामाचा वाटे सडोधाना।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना

या शेवटच्या भागात गणपतीच्या लंबोदर रूपासोबत पितांबर, सरळ सोंड, वक्रतुंड आणि त्रिनेत्र या रूपवैशिष्ट्यांचा उल्लेख येतो. शेवटी भक्त संकटाच्या वेळी गणरायाने धावून यावे आणि आपले रक्षण करावे, अशी मनापासून प्रार्थना केली आहे.

आरतीचा मुख्य संदेश

‘सुखकर्ता दुखहर्ता’ आरती केवळ गणपतीच्या रूपाचे वर्णन करत नाही, तर संकटांमध्ये श्रद्धा, आशा आणि धैर्य टिकवण्याचा संदेशही देते. म्हणूनच गणेशोत्सवात आणि गणपतीच्या दैनंदिन पूजेत ही आरती आजही विशेष भक्तिभावाने म्हटली जाते.

 

Web Title: Sukhkarta dukhharta ganesh aarti meaning line by line

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 09:21 PM

Topics:  

  • Ganeshotsav
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
1

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

एका कॉटन शर्टसाठी 2,700 लिटर पाणी? फास्ट फॅशनच्या चमकदार जगामागचं कटू सत्य! जाणून घ्या
2

एका कॉटन शर्टसाठी 2,700 लिटर पाणी? फास्ट फॅशनच्या चमकदार जगामागचं कटू सत्य! जाणून घ्या

Ganeshotsav Special: कोकणातील गणेशोत्सवाची अनोखी परंपरा! गणरायाच्या वर बांधलेल्या ‘कवंडळा’मागची परंपरा जाणून घ्या
3

Ganeshotsav Special: कोकणातील गणेशोत्सवाची अनोखी परंपरा! गणरायाच्या वर बांधलेल्या ‘कवंडळा’मागची परंपरा जाणून घ्या

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह
4

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.