Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Bhasha: मराठी पोटभाषा कोणत्या आणि किती आहेत, तुम्हाला माहीत आहे का?

मराठी भाषा ही प्रमाण भाषा असून त्याच्या अनेक पोटभाषा आहेत. तुम्हाला नक्की किती पोटभाषा माहीत आहेत? याची संपूर्ण माहिती जाणून घ्या सोप्या शब्दात. कोणत्या भागात कोणती भाषा बोलली जाते?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 17, 2026 | 03:39 PM
मराठी भाषेच्या किती पोटभाषा (फोटो सौजन्य - Social Media)

मराठी भाषेच्या किती पोटभाषा (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us
Follow Us:
  • मराठी भाषेच्या किती पोटभाषा आहेत 
  • कोणत्या भागात कोणती पोटभाषा
  • मराठी पोटभाषेविषयी तुम्हाला माहीत आहे का? 
मराठी भाषेत भौगोलिक व सामाजिक फरकांमुळे अनेक पोटभाषा ज्याला आपण बोलीभाषा असं म्हणतो त्या विकसित झाल्या आहेत. मुख्य प्रमाण भाषेचे व्याकरण एकच असले, तरी दर १२ कोसांवर शब्दांचे उच्चार, शब्दसंग्रह आणि वाक्प्रचार बदलतातय. तुम्हाला माहीत आहे का? महाराष्ट्रात ४० ते ६० पेक्षा जास्त पोटभाषा बोलल्या जातात. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साधारण प्रमुख मराठी पोटभाषा नक्की कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या भागात बोलल्या जातात आपण जाणून घेणार आहोत. तुम्हीही उत्सुक आहात ना? चला तर मग जराही विलंब न करता जाणून घेऊया. 

Marathi Bhasha Din : मराठी भाषा कशी निर्माण झाली ? साहित्य ते बोलीभाषा आतापर्यंतचा मराठीचा प्रवास खूपच रंजक

कोणत्या आहेत पोटभाषा?

  • अहिराणी भाषाः उत्तर महाराष्ट्रात अर्थात जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणांवर बोलली जाणारी ही एक अत्यंत लोकप्रिय बोलीभाषा आहे. अनेक कवी आणि कलाकार अहिराणी भाषेतून व्यक्त होताना दिसतात
  • पुणेरी: पुणे आणि आसपासच्या परिसरातील प्रमाण मराठीशी जवळीक साधणारी ही बोलीभाषा आहे. बऱ्यापैकी शुद्ध मराठी या परिसरांमध्ये बोलले जाते 
  • वऱ्हाडी भाषा: विदर्भ भागात जो अमरावती, नागपूर, बुलढाणा, यवतमाळ इत्यादी प्रकर्षाने गणला जातो त्या भागात वऱ्हाडी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते。यात ‘मला’ ऐवजी ‘मले’, ‘तुला’ ऐवजी ‘तुले’ असा उच्चार होतो
  • मालवणी भाषा: दक्षिण कोकणात साधारणतः सिंधुदुर्ग जिल्हा ज्यात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी समाविष्ट आहे, तिथे बोलली जाणारी मालवणी ही गोड भाषा आहे。यात ‘माका’ म्हणजे मला, ‘तुका’ म्हणजे तुला असे शब्द वापरले जातात
  • मराठवाडी भाषा: मराठवाड्यात ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर इत्यादीचा समावेश आहे तिथे ही भाषा बोलली जाते, ज्यावर उर्दू आणि कानडी भाषेचा थोडा प्रभाव जाणवतो
  • कोल्हापुरी मराठी: पश्चिम महाराष्ट्रात अर्थात कोल्हापूर, सांगली या भागांमध्ये बोलली जाणारी, रांगड्या लहेजाची आणि खास वेगळ्या उच्चारशैलीची ही बोली आहे. अनेक मराठी मालिकांमधूनही ही भाषा आपल्या कानावर पडत असते 
  • आगरी आणि कोळी बोलीभाषा: मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील आगरी आणि कोळी समाजाची ही मुख्य बोलीभाषा आहे 
  • झाडीबोली: पूर्व विदर्भात जो भाग भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हा आहे इथे ही भाषा बोलली जाते. या भागात घनदाट जंगले अर्थात झाडी असल्याने तिला ‘झाडीबोली’ म्हणतात 
  • कोकणी / गोमंतकी: कोकण किनारपट्टी आणि गोव्यात बोलली जाणारी ही एक महत्त्वाची भाषा आहे. याला एक वेगळाच लहेजा असतो आणि हीदेखील मराठीची पोटभाषा आहे
याव्यक्तिरिक्त अनेक पोटभाषा आहेत, दरवर्षी अनेक पोटभाषा लुप्त होतात. ५० वर्षांत भारतातल्या २० टक्के भाषा लुप्त झाल्या असे अभ्यासात सांगण्यात येते. याशिवाय २०११ च्या जनगणनेनुसार भारतात २०००हून अधिक बोलीभाषा आहेत. तुम्हाला याबाबत माहीत होते का? आम्हाला नक्की कळवा.  

मराठी भाषेला ‘मराठी’ हे नाव कस पडलं? शब्दाच्या नावामागची रंजक कथा जाणून घ्या

पहा व्हिडिओ 

 

Web Title: Marathi language and sub language in maharashtra detailed information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Marathi Language
  • marathi latest news
  • Marathi Literature

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.