Mental Stress कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना आणि मानेला करा तेलाने मसाज
धावपळीवाच्या जीवनशैलीचा परिणाम शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यावर सुद्धा लगेच दिसून येतो. याशिवाय मनात सुरु असलेल्या विचारांमुळे काहीवेळा रात्रीच्या वेळी व्यवस्थित झोप लागत नाही. शरीरात निर्माण झालेली झोपेची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अपचन, उलट्या, मळमळ, पोटात वेदना होणे, अशक्तपणा, थकवा इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी स्वतःसाठी वेळ देणे जास्त गरजेचे आहे. शांत झोप शरीरासाठी औषधासमन आहे. त्यामुळे नियमित ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा शरीरात वाढलेल्या वेदना किंवा थकवा कमी करण्यासाठी अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र वारंवार पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे किडनी निकामी होते.(फोटो सौजन्य – istock)
World Mental Health Day 2025: शांतताप्रिय आयुष्यासाठी लाऊन घ्या 5 सवयी, मानसिक आरोग्य राहील उत्तम
दीर्घकाळ कायमच निरोगी राहण्यासाठी झोपण्याआधी पायांच्या तळव्याला, हातांना आणि मानेवर तेलाने हलक्या हाताने मालिश करावी. हा उपाय सहज कोणीसुद्धा करू शकत. शरीरावर हलक्या हाताने तेलाची मालिश केल्यास केवळ शरीराला नाहीच तर मनाला सुद्धा अनेक फायदे होतात. मानसिक तणाव कमी होण्यासोबतच शरीर सुद्धा कायमच सक्रिय राहते. आज आम्ही तुम्हाला शांत झोपेसाठी शरीराला कोणत्या तेलाने मालिश करावे? मालिश केल्यामुळे शरीराला नेमके फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
झोपण्याआधी पायांना, मानेवर आणि हाडांमध्ये वाढलेल्या वेदनांवर कोमट गरम केलेल्या खोबरेल तेलाचा मालिश करावा. मालिश केल्यामुळे स्नायूंमधील वेदना कमी होण्यासोबतच मानसिक तणाव कमी होतो. शरीरसंबंधित वाढलेल्या समस्या कमी करण्यासाठी प्रामुख्याने पायांच्या तळव्यांवर खोबरेल तेल, तिळाचे तेलाने मसाज केला जातो. यामुळे पायातील वेदना, बधिरपणा किंवा सूजही कमी होण्यास मदत होते. काहीवेळा सतत काम करून हातांवर तणाव येतो, नसांमध्ये वेदना वाढू लागतात. हातांच्या स्नायूंवर वाढलेला तणाव कमी करण्यासाठी कोमट तेलाने हातांवर हलकीशी मसाज करावी. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि सांध्यांमधील लवचिकता वाढते.
जास्त वेळ लॅपटॉप, संगणकवर काम करत बसून राहिल्यामुळे मानेवर तणाव येतो आणि मानेच्या नसा आखडून जातात. मानेच्या आखडलेल्या नसांमुळे डोके दुखी, कंबर दुखणे, अचानक चक्कर येणे, खांदे दुखी इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आखडलेल्या नसा पुन्हा सक्रिय करण्यासाठी तेलाने मसाज करावा. यामुळे डोकेदुखीची समस्या कमी होते आणि वेदनांपासून आराम मिळतो. नर्व्हस सिस्टमला विश्रांती देण्यासाठी हलक्या हाताने तेलाचा मसाज करावा. रात्री झोपण्याआधी तेलाने केलेला मसाज संपूर्ण शारीरिक आणि मानसिक समस्यांपासून आराम मिळेल.
World Arthritis Day: ह्रुमाटॉइड आर्थ्रायटिसचे लवकर निदान होणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या सविस्तर
तणाव म्हणजे काय?
तणाव म्हणजे तीव्र भावनांचा प्रतिसाद, जी एखाद्या व्यक्तीला आव्हानात्मक किंवा धोकादायक वाटणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार करते.
तणावाच्या लक्षणांमध्ये काय समाविष्ट आहे?
पित्त वाढणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, उच्च रक्तदाब, दमा आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.अति राग येणे, निरुत्साह, उदासीनता, निद्रानाश, विस्मरण आणि कोणत्याही कामात रस न वाटणे.
तणावाचे व्यवस्थापन कसे करावे?
हसण्यामुळे तणाव निर्माण करणारा कॉर्टिसॉल हा हार्मोन कमी होतो आणि मूड सुधारतो.ध्यान, मसाज आणि दीर्घ श्वासोच्छ्वासामुळे हृदय गती कमी होण्यास आणि मन शांत होण्यास मदत होते.