
रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर करा 'या' तेलाने मसाज, सकाळी उठल्यानंतर चेहरा दिसेल टवटवीत आणि फ्रेश
चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी करण्यासाठी उपाय?
थंडीत कोणत्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करावा?
त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय?
वर्षाच्या बाराही महिने स्किन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. प्रत्येक ऋतूनुसार स्किन केअर प्रॉडक्ट आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे. कारण वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासोबतच चेहरा आणि केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो आणि त्वचा खूप जास्त कोरडी होते. याशिवाय रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात उबदारपणा टिकून राहील अशाच पदार्थांचे आहारात सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)
थंडीत त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या तेलाने किंवा इतर स्किन केअर प्रॉडक्टने त्वचा मसाज करावी. यामुळे खराब झालेली त्वचा पुन्हा उजळदार होऊन सुंदर दिसू लागते. थंड वातावरणामुळे ताणलेली त्वचा पुन्हा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी रात्री झोपण्याच्या आधी तेलाने मसाज करावा. यामुळे त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळेल. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर आणि चमकदार राहते. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि डेड स्किन कमी होण्यास मदत होते.
रात्री झोपण्याआधी दोन ते तीन बदाम तेल हातांवर घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावा. यामुळे त्वचा टवटवीत आणि फ्रेश दिसेल. बदाम तेलात विटामिन ई आणि अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. बदाम तेलाचा वापर केसांच्या वाढीसाठी सुद्धा केला जातो. चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या आणि टॅनिंग इत्यादी सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बदाम तेलाचा नियमित वापर करावा. यामुळे त्वचेमधील ओलावा टिकून राहील आणि त्वचा आतून स्वच्छ राहील.
ऑलिव्ह ऑइलचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. या तेलाच्या वापरामुळे जेवणाची चव खूप सुंदर लागते. याशिवाय त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जातो. चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल अतिशय प्रभावी ठरेल. ऑलिव्ह ऑइलचे दोन थेंब हातांवर घेऊन हलक्या हाताने मसाज करा. सकाळी उठल्यानंतर त्वचा खूप जास्त फ्रेश दिसेल.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर केला जातो. दक्षिण भारतात खोबऱ्याच्या तेलाचा वापर जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच रात्री झोपण्याआधी खोबऱ्याचे तेल चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज केल्यास आठवडाभरात त्वचा उजळदार आणि सुंदर दिसेल. तसेच त्वचेची पोत सुद्धा सुधारेल.