Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकाच महिन्यात दोन वेळा मासिक पाळी येते? महिलांच्या शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे बिघडते आरोग्य

महिन्यातून दोन वेळा मासिक पाळी येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. कारण शरीरसंबंधित निर्माण झालेल्या समस्यांमुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 17, 2026 | 05:30 AM
एकाच महिन्यात दोन वेळा मासिक पाळी येते? महिलांच्या शरीरात होणाऱ्या 'या' बदलांमुळे बिघडते आरोग्य

एकाच महिन्यात दोन वेळा मासिक पाळी येते? महिलांच्या शरीरात होणाऱ्या 'या' बदलांमुळे बिघडते आरोग्य

Follow Us
Close
Follow Us:

महिन्यातून दोनदा मासिक पाळी का येते?
मासिक पाळीच्या दिवसांमध्ये उद्भवणाऱ्या समस्या?
मासिक पाळीच्या चक्रात कशामुळे बिघाड होतो?

सर्वच महिलांना प्रत्येक महिन्यात मासिक पाळी येते. मासिक पाळी येणे हे अतिशय सामान्य आहे. कारण ही शरीरातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यामुळे महिन्यातील चार किंवा पाच दिवस मासिक पाळी येते. पाळी येण्याच्या आधी आणि पाळी आल्यानंतर शरीरसंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. अशक्तपणा, कंबर दुखणे, चक्कर येणे, उलट्या, मळमळ इत्यादी लक्षणे दिसू लागतात. पण धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे महिला स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. त्यामुळे मासिक पाळी येऊन गेल्यानंतर पुन्हा त्याच महिन्यात दुसऱ्यांदा मासिक पाळी येणे, हे शरीरसंबंधित गंभीर आजाराचे संकेत आहेत. त्यामुळे प्रत्येक महिन्यात तुम्हाला जर दोनदा मासिक पाळी येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया महिन्यातून दोनदा मासिक पाळी का येते आणि त्यामागील सविस्तर कारण.(फोटो सौजन्य – istock)

ओल्या कचऱ्याच्या घाणेरड्या दुर्गंधीमुळे शरीराला होईल ‘या’ संसर्गजन्य आजारांची लागण, दुर्गंधी ठरेल जीवघेणी

हार्मोन असंतुलन:

महिलांच्या शरीरात सतत हार्मोनल बदल होत असतात. या बदलांचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. अ‍ॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनसारखे हार्मोन्स मासिक पाळीवर परिणाम करतात. यामुळे अनियमित मासिक पाळी तर काही वेळा महिन्यातून दोनदा सुद्धा मासिक पाळी येण्याची शक्यता असते. हार्मोनल बदलांचा परिणाम मासिक पाळीच्या चक्रावर लगेच दिसून येतो. याशिवाय वाढलेला मानसिक तणाव, जीवनशैलीत होणारे बदल शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडून टाकतात.

गर्भाशय फायब्रॉएड:

वय वाढल्यानंतर किंवा तरुण वयात शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण कालातंराने या समस्या आणखीनच तीव्र होतात आणि शरीराला धोका निर्माण करतात. Uterine Fibroids हे गर्भाशयाच्या आतमध्ये तयार होणाऱ्या छोट्या छोट्या गाठी आहेत. गर्भाशयात तयार झालेल्या गाठीच्या आकारावर मासिक पाळीमध्ये कमी किंवा जास्त रक्तस्त्राव होणे अवलंबून असते. फायब्रॉएडच्या गाठी वाढू लागल्यानंतर काहीवेळा महिन्यातून दोनदा सुद्धा मासिक पाळी येते.

सकाळच्या नाश्त्यात नियमित चहा बिस्कीट खात असाल तर थांबा! आरोग्यावर होतील गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध

थायरॉइड:

महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारा गंभीर आजार म्हणजे थायरॉइड. हायपरथायरायडिज्म किंवा हायपोथायरायडिज्म असे थायरॉइडचे दोन प्रकार आहेत. या दोन्ही आजारांमध्ये वेगवेगळी लक्षणे महिलांच्या शरीरात दिसून येतात. थायरॉइडचा मासिक पाळीच्या चक्रावर लगेच परिणाम होतो. काहीवेळा खूप जास्त रक्तस्त्राव तर कधी अतिशय रक्तस्त्राव होऊन महिलांचे आरोग्य बिघडते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एका महिन्यात दोन वेळा पाळी येणे सामान्य आहे का?

    Ans: नाही, साधारणतः २८-३५ दिवसांचा मासिक चक्र असतो. त्यापेक्षा कमी अंतरात पाळी येत असल्यास ते अनियमित मानले जाते.

  • Que: दोन वेळा पाळी येण्यामागची प्रमुख कारणे कोणती?

    Ans: हार्मोन्सचे असंतुलन, ताण-तणाव, थायरॉईड समस्या, PCOS किंवा गर्भाशयाशी संबंधित त्रास ही प्रमुख कारणे असू शकतात.

  • Que: हार्मोनल बदलांचा पाळीवर कसा परिणाम होतो?

    Ans: हार्मोन्समध्ये बदल झाल्यास पाळी वेळेआधी किंवा उशिरा येऊ शकते, तसेच रक्तस्रावाचे प्रमाणही बदलू शकते.

Web Title: Menstruation twice in one month due to these changes in womens body health deteriorates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • period
  • thyroid care
  • women health

संबंधित बातम्या

Thyroid:  थायरॉईड नियंत्रणात ठेवायचंय? आहारात करा ‘हे’ बदल, शरीर राहिल निरोगी
1

Thyroid: थायरॉईड नियंत्रणात ठेवायचंय? आहारात करा ‘हे’ बदल, शरीर राहिल निरोगी

World Thyroid Day: थायरॉईडचा ‘सायलेंट गेम’; थकवा, वजन बदल…;  शरीर देत असलेल्या ‘या’ इशाऱ्यांकडे दुर्लक्ष नको, अशी ओळखा लक्षणे
2

World Thyroid Day: थायरॉईडचा ‘सायलेंट गेम’; थकवा, वजन बदल…; शरीर देत असलेल्या ‘या’ इशाऱ्यांकडे दुर्लक्ष नको, अशी ओळखा लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.