
डोळ्यांभोवती आलेले काळे डाग आणि टॅनिंग घालवण्यासाठी लिंबाच्या रसात मिक्स करा 'हे' पदार्थ
धावपळीची जीवनशैली, कामच वाढलेला ताण, अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल, अति मोबाईलचा वापर,जागरण इत्यादी अनेक कारणामुळे डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ येऊ लागतात. डोळ्यांच्या खाली आलेली काळी वर्तुळ लवकर जात नाही. त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी वेगवेगळ्या क्रीम वापरल्या जातात तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण यामुळे डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळ लवकर निघून जात नाहीत. यामुळे त्वचेवर टॅनिंग वाढण्याची शक्यता असते. डोळ्यांभोवती आलेले काळे डाग अनेक कारणामुळे त्वचेवर येतात. चेहऱ्यावर सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेवर टॅनिंग वाढण्याची शक्यता असते. डोळ्यांभोवती जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी महिला अनेक उपाय करतात.(फोटो सौजन्य – istock)
काखेत वाढलेला काळेपणा लवकर जात नाही?आजीबाईच्या बटव्यातील ‘हा’ उपाय ठरेल प्रभावी, काळेपणा होईल गायब
डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी कोणत्याही हानिकारक रसायनांचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी लिंबाच्या रसात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती पदार्थ त्वचेवर नैसर्गिक चमक कायमच टिकवून ठेवतात. यामुळे त्वचेवर वाढलेला तेलकटपणा कमी होईल आणि त्वचा उजळदार सुंदर दिसेल.
चेहरा चमकदार करण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात टोमॅटोचा रस, काकडीचा रस आणि कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून घ्या. त्यानंतर हलक्या हाताने काहीवेळ त्वचेवर मसाज करा. यामुळे घामामुळे चेहऱ्यावर साचून राहिलेली डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल. तसेच तुम्ही त्वचा कायमच स्वच्छ आणि सूंदर दिसेल. चेहऱ्यावर लावलेला फेसपॅक ३० मिनिटं तरी त्वचेवर तसाच लावून ठेवा. यामुळे त्वचा स्वच्छ होईल.
लिंबाच्या रसात असलेले सायट्रिक ऍसिड त्वचेवर वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी मदत करतात. याशिवाय टॅनिंगमुळे काळी झालेली त्वचा उजळदार आणि सुंदर करण्यासाठी लिंबाचा रस अतिशय प्रभावी आहे. काकडीमध्ये असलेले अतिरिक्त पाणी त्वचा हायड्रेट ठेवते. त्यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी काकडीच्या रसाचा वापर करावा. सुंदर त्वचेसाठी टोमॅटोचा रस गुणकारी आहे. यामुळे डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग किंवा उन्हामुळे काळी झालेली त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल.