काखेत वाढलेला काळेपणा लवकर जात नाही?आजीबाईच्या बटव्यातील 'हा' उपाय ठरेल प्रभावी
सर्वच महिलांना नेहमीच सुंदर आणि चमकदार हवी असते. सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेशिअल केले जाते तर क्लीनअप करून त्वचेवर पिंपल्स आणि मुरूम क्लीन केले जाते. पण सर्वच महिला त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. पण काखेतील काळेपणा जास्त लक्ष दिले जात नाही. काखेत वाढलेल्या काळेपणामुळे काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. काखेत वाढलेले केस काढण्यासाठी महिला कधी वॅक्सिंगचा वापर करतात, तर कधी लेझरचा वापर करून काखेतील केस काढले जातात. वारंवार काखेत लेझर फिरवल्यामुळे काखेतील त्वचा अतिशय काळी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे त्वचेवर वाढलेली डेड स्किन निघून जाईल.(फोटो सौजन्य – istock)
काखेत वाढलेली डेड स्किन काढून टाकण्यासाठी हळद आणि मसूर डाळीच्या स्क्रबचा वापर करावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार होते. यासाठी मिक्सरच्या भांड्यात मसूर डाळ आणि थोडीशी हळद घेऊन बारीक पावडर तयार करून घ्या. तयार केलेली पावडर वाटीमध्ये घेऊन त्यात कच्चे दूध किंवा गुलाब पाणी घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काखेत वाढलेल्या काळेपणा लावून हलक्या हाताने मिक्स करा. त्यानंतर काहीवेळ तसेच ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित आठवडाभर केल्यामुळे काखेत वाढलेला काळेपणा कमी होईल आणि त्वचा उजळदार दिसू लागेल.
लिंबामध्ये असलेले सिट्रिक अॅसिड त्वचेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी मदत करतो. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग, काखेतील काळेपणा कमी होण्यास मदत होईल. साखरेमध्ये असलेले सौम्य ग्रॅन्युल्स त्वचेवर वाढलेली टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतो. यासाठी वाटीमध्ये लिंबाचा रस घेऊन त्यात साखर टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काखेत लावून हलक्या हाताने किंवा लिंबाच्या सालीने त्वचेवर मसाज करा. यामुळे काखेत वाढलेला काळेपणा कमी होईल आणि काख उजळदार दिसेल. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास काखेत वाढलेला काळेपणा कमी होईल.
त्वचेवर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी सर्वच महिला बेसनाचा वापर करतात. बेसन आणि दह्याचे मिश्रण त्वचेसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होईल. यासाठी वाटीमध्ये बेसन घूं दही टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण बोटांच्या सहाय्याने मिक्स करा. त्यानंतर काखेत वाढलेल्या काळेपणावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे काखेत वाढलेला काळेपणा कमी होईल.