झोपण्याआधी दुधात मिक्स करा 'हा' प्रभावी पदार्थ
शरीरामध्ये विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची सुरुवात होते. हातांपायांमध्ये वाढलेल्या वेदना, पचनससंस्था बिघडणे, झोपेची कमतरता इत्यादी आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. शरीरात निर्माण झालेली विटामिन्सची कमतरता आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर अचानक जाग येणे, हातापायांमध्ये वाढलेल्या वेदना, झोपेतून उठल्यानंतर अंग दुखणे किंवा हाडांमधून अचानक वेदना जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात फळे, भाज्या आणि पौष्टिक घटकांचे सेवन करणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – iStock)
बऱ्याचदा शरीरात वाढलेला मानसिक तणाव संपूर्ण आरोग्य बिघडण्याचे कारण ठरतो. त्यामुळे आहारात बदल करून झोपेच्या योग्य वेळा फॉलो करणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे तणाव वाढून शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रात्रीच्या शांत झोपेसाठी दुधात कोणता पदार्थ मिक्स करून प्यायल्यास तात्काळ आराम मिळेल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
रात्रीच्या वेळी शांत झोपेसाठी दुधात जायफळ पावडर मिक्स करून प्यावी. जायफळ पावडरचे सेवन केल्यामुळे शरीरात निर्माण झालेला मानसिक तणाव कमी करण्यासाठी जायफळ प्रभावी ठरते. यामध्ये आढळून येणारे नैसर्गिक ‘माय्रेस्टिसिन’ मानसिक तणाव कमी करण्यासाठी मदत करते. मेंदूतील सेरोटोनिन आणि मेलाटोनिन हे हार्मोन्स सक्रिय ठेवण्यासाठी आहारात जायफळ पावडरचे सेवन करावे. रात्री झोपताना नियमित जायफळाचे दूध प्यायल्यामुळे शांत झोप लागते आणि मन शांत राहते.
दुधामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अॅसिड आढळून येते, ज्यामुळे शरीरात सेरोटोनिनच्या निर्मितीस मदत होते. कोणत्यावेळी झोपे संबंधित समस्या उद्भवू लागल्यास दूध किंवा दुधात जायफळ पावडर मिक्स करून प्यावी. जायफळमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीर रिलॅक्स राहते, मनावरील ताण कमी होतो आणि रात्री शांत झोप लागते.
गोळी किंवा इंजेक्शन घेऊन खरंच करता येतं Weight Loss? जाणून घ्या सत्य
बऱ्याचदा अनेक लोक शांत झोपेसाठी रात्रीच्या वेळी झोपेच्या गोळ्यांचे सेवन करतात. तर काहींना झोपेच्या औषधांचे सेवन केल्याशिवाय रात्री झोपच येत नाही. मात्र वारंवार झोपेच्या औषधांचे सेवन केल्यास शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होणे, किडनी निकामी होणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात. जायफळचे सेवन केल्यामुळे रात्रीच्या वेळी गोळ्या औषधांशिवाय चांगली झोप लागते.