फेसपॅक बनवण्याची कृती
बदलते हवामान, वाढलेले प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, अपुरी झोप इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर लगेच दिसून येतो. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचा लवकर चांगली होत नाही. त्यामुळे त्वचेची सर्वच ऋतूंमध्ये योग्य ती काळजी घ्यावी. त्वचा सुंदर आणि चमकदार करण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादने वापरतात, मात्र त्याचा फारसा प्रभाव चेहऱ्यावर दिसून येत नाही. त्वचेला सूट न होणाऱ्या उत्पादनाचा वापर केल्यामुळे त्वचा आणखीनच खराब होऊन जाते. त्यामुळे त्वचेवरील तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे. नैसर्गिक पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा उठावदार आणि सुंदर दिसते. आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी दह्यात कोणते पदार्थ मिक्स करून लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
तांदळाचे पाणी आणि तांदळाचे पीठ त्वचेसाठी अतिशय प्रभावी आहे. तांदळाच्या पिठामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा उजळण्यास मदत होते. शिवाय त्वचेवरील पिंपल्स आणि डाग कमी होतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला स्वच्छ करतात आणि डेड स्किन काढून त्वचा उजळतात. डागविरहित त्वचेसाठी तांदळाच्या पिठाचा वापर करावा. यामुळे त्वचा तरुण आणि सुंदर दिसते.
चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी कॉफी पावडरचा वापर करावा. कॉफी पावडर नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून कार्य करते. शिवाय यामुळे त्वचेचे रक्तभिसरण सुधारते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. कॉफीमध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेवरील लालसरपणा कमी करतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या सूंदर करण्यासाठी मदत करतात.
दैनंदिन आहारात अनेक लोक दह्याचे सेवन करतात. दही खाल्यामुळे आरोग्यासह त्वचेलासुद्धा पोषण मिळते. यामुळे त्वचेमधील आर्द्रता टिकून राहते आणि त्वचा मऊ चमकदार होण्यास मदत होते. दह्याचा फेसपॅक करून त्वचेला लावल्यामुळे चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग आणि पिंपल्स निघून जाण्यास मदत होते.त्वचा ताजी टवटवीत ठेवण्यासाठी दही अतिशय गुणकारी आहे.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
वाटीमध्ये एक चमचा तांदळाचे पीठ, कॉफीची पावडर आणि एक चमचा दही घेऊन मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावून 15 ते 20 मिनिटं ठेवून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवरील डाग, टॅनिंग निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होईल.