Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

40% पेक्षा जास्त रुग्णांना LDLC पातळीबद्दल माहिती नाही, मुंबईतील डॉक्टरांचे निरीक्षण

LDLC levels: हृदयाचं आरोग्य जपायचं तर फक्त आहार आणि व्यायाम इतकंच सांभाळणं पुरेसं नसतं त्यासाठी आपल्या आरोग्याचे, विशेषत: एलडीएलसी म्हणजे बॅड कोलेस्ट्रोलचे गणित समजून घेणे आवश्यक आहे. कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय)च्या मते एलडीएलसीची वाढलेली पातळी हा जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण असलेल्या हृदयविकारास कारणीभूत ठरणारा आघाडीचा घटक आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 27, 2024 | 04:57 PM
कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणी आवश्यक

कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणी आवश्यक

Follow Us
Close
Follow Us:

एलडीएलसी नियंत्रणात राखण्यासाठी आपणहून पावले उचलणे हे हृदयाशी संबंधित समस्यांना रोखण्याच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे. यासाठीच्या पाच अत्यावश्यक चाचण्यांसाठीची ही मार्गदर्शक सूची तुम्हाला आपल्या हृदयाच्या आरोग्याची सूत्रे आपल्या हातात ठेवण्यास मदत करू शकेल.

फोर्टिस हॉस्पिटल, मुंबईच्या कार्डिओलॉजिस्ट डॉ. झाकिया खान हृदयरोगांचा प्रतिबंध करण्यासाठी कोलेस्ट्रोलच्या व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्या सांगतात, “कोलेस्ट्रोलचे व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. तरीही अनेक जण या गोष्टीच्या महत्त्वाविषयी अनभिज्ञ असतात. 30-40 टक्‍के रुग्णांना त्यांच्या LDLC च्या पातळीविषयी कोणतीही माहिती नसते आणि आपल्यासाठी एलडीएलसीचे आदर्श प्रमाण काय असले पाहिजे याबाबत तर त्याहूनही थोड्या माणसांना माहिती असते असा अनुभव असल्याचेही सांगितले. (फोटो सौजन्य – iStock) 

कसे ठरते कारणीभूत 

तुम्हाला तुमच्या कॉलेस्ट्रोलची स्थिती सुस्पष्टपणे समजते

जागरुकतेच्या अशा अभावामुळे लवकरात लवकर वैद्यकीय हस्तक्षेपाची संधी हुकते. एलडीएलसीची वाढलेली पातळी हा कोरोनरी आर्टरी डिजिजेसना कारणीभूत ठरणारा एक प्रमुख घटक आहे, ज्यामुळे नियमित लिपिड स्क्रिनिंग्जचे महत्त्व अधिकच अधोरेखित होते. इतर निकषांबरोबरच लिपिड पॅनल, एलडीएलसी पातळी, वार्षिक आरोग्य तपासणी यांसारख्या चाचण्या आणि आपला रक्तदाब, साखरेची पातळी इत्यादींचे आकडे माहीत असणे या गोष्टींमुळे आम्हाला आमच्या रुग्णांसाठी उपचारांची सर्वोत्तम दिशा निश्चित करण्यात मदत होते. योग्य ते ज्ञान आणि वेळच्या वेळी केलेले व्यवस्थापन यामुळे व्यक्तींना असलेला हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो.”

लिपिड प्रोफाइल 

लिपीड प्रोफाईल तपासणे महत्त्वाचे

लिपिड प्रोफाइल हे तुमच्या हृदयाचे वैयक्तिक प्रगती पुस्तक असते. या चाचणीमध्ये एकूण कॉलेस्ट्रोल, एलडीएल कॉलेस्ट्रोल, एचडीएल कॉलेस्ट्रोल आणि ट्रायग्लिसाइड्स मोजले ज्याते, ज्यातून तुम्हाला तुमच्या कॉलेस्ट्रोलची स्थिती सुस्पष्टपणे समजते. सर्वसाधारणपणे नियमित आरोग्य तपासणीचा एक भाग म्हणून ही चाचणी करून घेण्यास सांगितले जाते. कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय)च्या शिफारशीनुसार वयाच्या १८व्या वर्षापासून आपल्या नियमित आरोग्य तपासणीचा भाग म्हणून ही चाचणी करून घेण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. तुमच्या चाचणीचे परिणाम तुम्हाला आहारात काही बदल करण्याची बदल करण्याची किंवा औषधोपचारांची गरज आहे का याविषयी मार्गदर्शन करतील. 

एलडीएलसीची पातळी

सर्व एलडीएल कॉलेस्ट्रोल सारखे नसतात आणि आपली इप्सित एलडीएलसी पातळी माहीत असल्यास तुम्हाला आपल्या हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असे अनेक तपशील मिळू शकतात. एलडीएलसीची वाढलेली पातळी हे तुमच्या धमन्यांमध्ये प्लाक जमा होण्यासाठी कारणीभूत ठरणारा प्रमुख घटक आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. एलडीएलसीची पातळी इष्टतम स्तरापर्यंत खाली आणण्यावर लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीच्या उपचारांना अधिक परिणामकारकरित्या बेतून घेऊ शकता आणि कार्डिओव्हॅस्क्युलर समस्यांना प्रतिबंध करण्यासाठी पावले उचलू शकता. 

हेदेखील वाचा – कोलेस्ट्रॉल शरीरातून बाहेर फेकतील 5 पदार्थ, आजच खायला करा सुरूवात

हाय-सेन्सिटिव्हिटी सी-रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटीन (hs-CRP) चाचणी 

hs-CRP चाचणीमध्ये तुमच्या रक्तातील सी-रिअ‍ॅक्टिव्ह प्रथिनाची पातळी मोजली जाते. शरीरामध्ये इन्फ्लेमेशन असेल तर ही पातळी वाढते. Hs-CRP ची पातळी विशेषत: तुमची एलडीएलसी पातळी वाढलेली असताना वाढल्याचे दिसून आले तर त्याचा संबंध बहुतेकदा हृदयविकाराच्या वाढलेल्या धोक्याशी जोडला जातो. ही एक साधी रक्ततपासणी आहे, जिच्यामुळे डॉक्टरांना तुमच्या शरीरातील इन्फ्लमेशनमुळे तुमचा हृदयविकाराचा धोका अधिक वाढतोय का याचे मूल्यमापन करण्यास मदत होते. 

कोरोनरी आर्टरी कॅल्शियम (सीएससी) स्कोअर 

ही चाचणी कॉलेस्ट्रोलचे प्रमाण काठावर किंवा मध्यम असलेल्या रुग्णांसाठी विशेषत्वाने उपयुक्त ठरते

सीएसी स्कोअर वा सीएसी गुणांकनामध्ये तुमच्या हृदयाकडे जाणाऱ्या धमन्यांच्या (कोरोनरी आर्टरीज) भिंतींमध्ये किती कॅल्शियम जमले आहे हे मोजले जाते, ज्यातून या वाहिन्यांमध्ये प्लाक जमा झाल्याचे निदर्शनास येते. ही चाचणी कॉलेस्ट्रोलचे प्रमाण काठावर किंवा मध्यम असलेल्या रुग्णांसाठी विशेषत्वाने उपयुक्त ठरते, कारण यातून हदयविकाराच्या धोक्याचे एक सुस्पष्ट चित्र मिळते. 

एपॉलिपोप्रोटीन बी (ApoB) चाचणी 

ApoB चाचणी ही तुमच्या रक्तातील एलडीएलचे पार्टिकल्स मोजण्याची आणखी अचूक पद्धत आहे. एलडीएलच्या प्रत्येक कणामध्ये ApoB प्रथिन असते, ही चाचणी या कॉलेस्ट्रोल वाहून नेणाऱ्या कणांची अचूक संख्या सांगते. आपली ApoB पातळी माहीत करून घेतल्याने तुम्हाला कॉलेस्ट्रोलचे व्यवस्थापन अधिक नेमकेपणाने करता येते व आपल्या आरोग्याच्या अधिक चांगल्या संरक्षणासाठी घातक एलडीएल कणांची समस्या दूर होण्याची हमी मिळते. 

हेदेखील वाचा – ‘हे’ हेल्दी ज्यूस रक्तवाहिन्यांमधून बाहेर काढतील LDL Cholesterol, आजच करा आहारात समाविष्ट

तुमच्या चाचण्यांच्या निष्कर्षांचा अर्थ लावणे व एलडीएलसीचे लक्ष्य निर्धारित करणे 

चाचणी किती महत्त्वाची

या चाचण्यांचे निष्कर्ष समजून घेणे ही आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पुढचे पाऊल कोणते उचलावेत हे निश्चित करणारी गुरुकिल्ली आहे. वय, कुटुंबाचा पूर्वेतिहास आणि चालू स्थितींसारख्या धोक्याच्या घटकांच्या आधारे तुमचे डॉक्टर्स तुमचे व्यक्तिगत एलडीएलसी लक्ष्य निश्चित करण्याच्या काम तुमची मदत करतील. तुमच्या हृदयाचे आरोग्य जास्तीत-जास्त चांगल्या प्रकारे जपण्यासाठी तुम्ही व तुमचे डॉक्टर एकत्र मिळून उपचारांची एक योजना आखू शकता, ज्यात जीवनशैलीतील बदल, औषधे यांचा समावेश असू शकेल. तुमचे एलडीएलसी इप्सित पातळीमध्ये असणे ह अत्यंत महत्त्वाचे आहे आणि कॉलेस्ट्रोलची तपासणी हे त्यादिशेने उचललेले पहिले पाऊल आहे. 

या महत्त्वाच्या चाचण्यांवर आपणहून लक्ष दत तुम्ही केवळ कॉलेस्ट्रोलवर नियंत्रण आणत नसून आपल्या हृदयाच्या आरोग्याची सूत्रे आपल्या हाती घेतल आहात. नियमित स्क्रिनिंग आणि संपूर्ण माहितीनिशी निर्णय घेणे हा हृदयविकाराला आधीच टाळण्याचा व तुमचे हृदय एकदम तंदुरुस्त स्थितीमध्ये ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

Web Title: More than 40 percent of patients are unaware of ldlc levels observes doctors in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2024 | 04:57 PM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Health News

संबंधित बातम्या

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
1

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Cholesterol Remedy: नसांमध्ये चिकटलेली चरबी ‘ही’ भाजी खाऊन झटकन वितळेल, वाढेल नैसर्गिक गुड कोलेस्ट्रॉल
2

Cholesterol Remedy: नसांमध्ये चिकटलेली चरबी ‘ही’ भाजी खाऊन झटकन वितळेल, वाढेल नैसर्गिक गुड कोलेस्ट्रॉल

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात
3

Weight Loss: जेवणानंतर ‘हे’ दोन पदार्थ पाण्यात करा मिक्स, थुलथुलीत चरबीही विरघळेल झटक्यात

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय
4

मोठी बातमी! ‘सार्वजनिक आरोग्य महत्वाचं’; कबुतरखान्यावर तूर्तास बंदीच, हायकोर्टाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.