आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांच्या खाण्याच्या सवयी वेगाने बिघडत चालल्या आहेत, त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी सुद्धा वाढू लागली आहे. उच्च कोलेस्टेरॉलची पातळी केवळ हृदयविकारांनाच नाही तर इतर गंभीर आरोग्य समस्यांना देखील कारणीभूत ठरू शकते. पण योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून तुम्ही तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेऊ शकतात. आज आपण 5 सर्वोत्तम भाज्यांच्या रसांबद्दल जाणून घेऊयात.
तुमचे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करेल हे ज्यूस (फोटो सौजन्य: Freepik)
टोमॅटो केवळ स्वादिष्टच नाही तर हृदयासाठी सुद्धा खूप फायदेशीर असते. यामध्ये लाइकोपीन नावाचे विशेष अँटिऑक्सिडंट आढळते, जे एलडीएल (खराब कोलेस्टेरॉल) ची पातळी कमी करण्यास मदत करते. रोज एक ग्लास टोमॅटोचा रस प्यायल्याने तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी गाजर खूप फायदेशीर मानले जाते. गाजरात मोठ्या प्रमाणात विरघळणारे फायबर असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. याशिवाय यात बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे हृदयाच्या नसा मजबूत करतात. तसेच हृदयविकाराचा धोका कमी करतात.
पालक हे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असते. पालकामध्ये ल्युटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होण्यापासून रोखण्यास मदत करते. पालकाचा रस नियमितपणे प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि कोलेस्ट्रॉलची पातळीही संतुलित राहते.
कारले खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. कारल्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या नसा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
बीटरूटचा रस हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. बीटरूटचा रस खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) पातळी वाढविण्यास मदत करतो.