Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Morning Headache: रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास? दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय ‘हे’ संकेत

Morning Headache Causes: दररोज सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर याकडे दुर्लक्ष करु नये. परंतु यामागे कारणे कोणती, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 31, 2026 | 08:16 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • रोज सकाळी डोकेदुखीचा त्रास?
  • शरीर देतंय ‘हे’ संकेत
  • डोकेदुखी टाळण्यासाठी काय कराल?
दररोज सकाळी उठल्यानंतर डोकेदुखीने दिवसाची सुरुवात होत असेल, तर ही बाब सामान्य समजून दुर्लक्ष करू नये. अधूनमधून डोकेदुखी होण्यामागे वेगवेगळे कारणे असू शकतात. परंतु, रोज किंवा वारंवार सकाळी डोके दुखत असेल तर त्यामागे झोपेची कमतरता, शरीरातील पाण्याची कमतरता, मायग्रेन किंवा इतर आरोग्याशी संबधित समस्या कारणीभूत असू शकतात. काही प्रकरणांमध्ये हे गंभीर न्यूरोलॉजिकल आजाराचे सुरुवातीचे लक्षणही असू शकते. सकाळी डोके दुखण्यामागची कारणे कोणती, जाणून घ्या.

Fine Lines: कमी वयातच चेहऱ्यावर दिसताहेत सुरकुत्या? जाणून घ्या त्यामागची खरी कारणे

डिहायड्रेशन

रात्री अनेक तास पाणी न प्यायल्यामुळे शरीरात सौम्य डिहायड्रेशन होऊ शकते. यामुळे मेंदूभोवतीच्या द्रवाचे संतुलन बिघडून डोकेदुखी सुरू होऊ शकते. दिवसातून पुरेसे पाणी न पिणाऱ्या व्यक्तींमध्ये हा त्रास अधिक दिसून येतो. म्हणून सकाळी उठल्यानंतर एक-दोन ग्लास पाणी पिण्याची सवय फायदेशीर ठरू शकते.

अपुरी झोप

दररोज सात ते आठ तासांची शांत झोप शरीरासाठी आवश्यक असते. उशिरापर्यंत जागरण, रात्री वारंवार जाग येणे किंवा अपुरी झोप यामुळे मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही. परिणामी सकाळी उठल्यावर डोकेदुखी जाणवू शकते.

स्लीप एपनिया

झोपेत काही क्षणांसाठी श्वास थांबण्याच्या समस्येला स्लीप एपनिया म्हणतात. यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. सकाळी डोकेदुखी, दिवसभर झोप येणे, मोठ्याने घोरणे आणि थकवा ही त्याची सामान्य लक्षणे आहेत.

मायग्रेन

मायग्रेनमध्ये डोक्याच्या एका बाजूला वेदना जाणवते. काही लोकांमध्ये हा त्रास सकाळी उठताच सुरू होतो. ताण, हार्मोन्समधील बदल, झोपेचा अभाव किंवा काही खाद्यपदार्थ यामुळे मायग्रेनचा झटका येऊ शकतो. यासोबत मळमळ, उलटी किंवा प्रकाशाचा त्रासही होऊ शकतो.

डोकेदुखी टाळण्यासाठी काय कराल?

  • दररोज पुरेसे पाणी प्या.
  • नियमित वेळेत झोपा आणि किमान सात ते आठ तासांची झोप घ्या.
  • ताण कमी करण्यासाठी योगा, ध्यान किंवा हलका व्यायाम करा.
  • झोपताना योग्य उशी आणि झोपेची योग्य पॉझिशनमध्ये झोपा.
  • कॅफिन आणि मद्यपानाचे अतिसेवन टाळा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर सकाळची डोकेदुखी वारंवार होत असेल, वेदना खूप तीव्र असतील, त्यासोबत चक्कर, उलटी, दृष्टी धूसर होणे किंवा बोलण्यात अडचण जाणवत असेल, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

महागडी क्रीम नको! तांदळाच्या पाण्यापासून घरच्या घरी बनवा नाईट क्रीम; चेहरा दिसेल तजेलदार

Web Title: Morning headache causes headache after waking up sleep apnea migraine tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:16 PM

Topics:  

  • Headache pain
  • headaches
  • lifestyle news in marathi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.