सतत पोट फुगणे, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास? तुमच्या रोजच्या ‘या’ सवयी ठरू शकतात घातक
वय वाढू लागल्यावर त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिनचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे त्वचेची लवचिकता घटते आणि सुरकुत्या दिसू लागतात.
अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे त्वचेतील कोलेजनचे नुकसान होते. दीर्घकाळ उन्हात राहिल्यास अकाली सुरकुत्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
धूम्रपान, मद्यपान, साखर आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे. तसेच फळे, भाज्या आणि प्रथिनांचा आहारातील अभाव यामुळे त्वचेचे आरोग्य बिघडू शकते.
सततचा मानसिक ताण आणि पुरेशी झोप न मिळाल्यास त्वचेची रिकव्हरी प्रक्रिया मंदावते. त्यामुळे अकाली वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात.
सतत कपाळावर आठ्या घालणे, डोळे बारीक करणे किंवा चेहऱ्यावरील एकाच प्रकारचे हावभाव वारंवार केल्यास एक्सप्रेशन लाइन्स हळूहळू कायमस्वरूपी सुरकुत्यांमध्ये बदलू शकतात.
सुरकुत्या पूर्णपणे नाहीशा करणे नेहमीच शक्य नसते, कारण त्या नैसर्गिक वृद्धत्व प्रक्रियेचाही भाग आहेत. मात्र योग्य स्किनकेअर, संतुलित आहार आणि निरोगी सवयींमुळे त्यांची तीव्रता कमी करता येते आणि नवीन सुरकुत्या काही प्रमाणात रोखले जाऊ शकते.






