Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mothers Day 2026 : महिलांनी दुर्लक्षित करू नयेत अशा 5 महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या, तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

मदर्स डे निमित्त महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर देण्याची गरज आहे. कर्करोग, मधुमेह, थायरॉईड, हृदयविकार यांसारखे गंभीर आजार लवकर निदान झाल्यास त्यावर योग्य वेळी उपचार करणे अधिक सोपे होतं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 09, 2026 | 07:10 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात
  • आरोग्यसेवेवर भर देण्याची गरज
  • आजार लवकर निदान झाल्यास उपचार अधिक सोपे
Mothers Day : महिला अनेकदा आपल्या कुटुंबाच्या आरोग्याला प्राधान्य देतात आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा लक्षणे गंभीर झाल्यानंतरच त्या डॉक्टरांकडे जातात. त्यामुळे यंदाच्या मदर्स डे निमित्त महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर देण्याची गरज आहे. कर्करोग, मधुमेह, थायरॉईड आणि हृदयविकार यांसारखे गंभीर आजार लवकर निदान झाल्यास त्यावर योग्य वेळी उपचार करणे अधिक सोपे होते. याबाबत विशेष मार्गदर्शन BDR Pharmaceuticals चे टेक्निकल डायरेक्टर डॉ. अरविंद बडिगर यांनी केले आहे.

What is E-Cigarette? ई-सिगारेट म्हणजे काय? जाणून घ्या वेपिंगबाबतचे समज आणि गैरसमज?

महिलांनी वयाची पर्वा न करता नियमितपणे करून घ्याव्यात अशा पाच महत्त्वाच्या आरोग्य तपासण्या पुढीलप्रमाणे:

1. स्तन कर्करोग तपासणी (Breast Cancer Screening)

स्त्रियांमध्ये कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. स्तन कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते. 40 वर्षांवरील महिलांनी नियमित मॅमोग्राफी करण्याचा विचार करावा, तर कमी वयाच्या महिलांनी महिन्यातून एकदा स्तनांची स्व-तपासणी (Breast Self-Examination) करावी.

2. गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि HPV तपासणी (Cervical Cancer & HPV Tests)

गर्भाशय मुखाचा कर्करोग वेळेत निदान झाल्यास टाळता येऊ शकतो. मात्र, माहितीचा अभाव किंवा संकोचामुळे अनेक महिला नियमित तपासण्या टाळतात. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करून घ्यावी.
ही लक्षणे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका दर्शवू शकतात:
* असामान्य योनीमार्गातून रक्तस्राव
* पोटाच्या खालच्या भागात किंवा श्रोणीमध्ये वेदना
* लैंगिक संबंधांदरम्यान वेदना
* योनीमार्गातून असामान्य स्त्राव
HPV लस घेतल्यास गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

3. रक्तातील साखर आणि मधुमेह तपासणी (Blood Sugar & Diabetes Testing)

बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, ताणतणाव आणि PCOS सारख्या समस्यांमुळे महिलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. मधुमेहाकडे दुर्लक्ष केल्यास हृदय, मूत्रपिंड, दृष्टी आणि प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
ज्या महिलांच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे, वजनात अचानक बदल होतात, वारंवार अशक्तपणा जाणवतो किंवा PCOS ची समस्या आहे, त्यांनी दरवर्षी रक्तातील साखर आणि HbA1c तपासणी करून घ्यावी.

4. थायरॉईड तपासणी (Thyroid Tests)

महिलांमध्ये थायरॉईडच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आढळतात. मात्र, त्याची लक्षणे अनेकदा ताणतणाव किंवा हार्मोनल बदल समजून दुर्लक्षित केली जातात. थकवा, केस गळणे, मूड बदलणे, वजन वाढणे, मासिक पाळीतील अनियमितता आणि झोपेच्या समस्या ही थायरॉईडची लक्षणे असू शकतात.
तपासणी का महत्त्वाची?
TSH, T3 आणि T4 या रक्त तपासण्यांद्वारे थायरॉईडशी संबंधित समस्या गंभीर होण्यापूर्वीच शोधता येतात.

5. हृदय तपासणी (Heart Check-Up)

पूर्वी हृदयविकार हा पुरुषांमध्ये अधिक आढळतो, अशी धारणा होती. मात्र, वाढता ताण, चुकीच्या आहाराच्या सवयी, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे महिलांमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे.
विशेषतः 35 वर्षांवरील महिलांनी रक्तदाब, कोलेस्टेरॉल, BMI आणि जीवनशैलीशी संबंधित तपासण्या नियमितपणे करून घ्याव्यात.
ही लक्षणे कधीही दुर्लक्षित करू नयेत:
* छातीत वेदना
* श्वास घेण्यास त्रास
* अतिशय थकवा
* चक्कर येणे किंवा हलके वाटणे
* पायांमध्ये सूज
महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हा पर्याय नसून गरज आहे. यंदाच्या मदर्स डे निमित्त प्रत्येक महिलेला स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा संकल्प करण्याची ही योग्य वेळ आहे.

Mother’s Day 2026: भावना आणि दैनंदिन उपयोगाचा सुंदर मिलाफ! मदर्स डे साठी आईला आवडतील अशा खास भेटवस्तू

Web Title: Mothers day special top 5 health checkups for women marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • happy mothers day
  • LIFESTYLE
  • mothers day

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा
1

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनाचा मंगल दिवस! अनंत चतुर्दशीच्या प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती
2

अँडोक्राईन डिस्टरप्टिंग केमिकल्स प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम करतात? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी
3

Air Fryer Tips: नवीन एअरफ्रायर घेतलाय? वापरण्याआधी ‘या’ गोष्टींची घ्या आवर्जून काळजी

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.