Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motion Sickness: प्रवासात मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय

Motion Sickness Home Remedies: कार, बस, ट्रेन, बोट किंवा विमानप्रवासादरम्यान काहींना मोशन सिकनेसचा त्रास होतो. योग्य काळजी घेतल्यास हा त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 30, 2026 | 06:36 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • प्रवासात मळमळ आणि उलटीचा त्रास होतो?
  • ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय
  • मोशन सिकनेस म्हणजे काय?
काही लोकांसाठी प्रवास हा आनंदापेक्षा त्रासदायक ठरतो. बस, कार, ट्रेन, बोट किंवा विमानात बसल्यानंतर मळमळ, चक्कर येणे, उलटी होणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा तक्रारी अनेकांना जाणवतात. या स्थितीला मोशन सिकनेस असे म्हटले जाते. ही गंभीर आजाराची लक्षणे नसली तरी प्रवासाचा संपूर्ण आनंद हिरावून घेऊ शकतात. काही सोप्या सवयी आणि योग्य खबरदारी घेतल्यास हा त्रास टाळता येऊ शकतो.

Perfume Side Effects: अतिप्रमाणात परफ्यूम वापरताय? मग सावधान! शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम

मोशन सिकनेस म्हणजे काय?

आपले डोळे, कानातील संतुलन यंत्रणा आणि शरीराला जाणवणारी हालचाल यामध्ये अडथळा निर्माण झाला की मेंदूला वेगवेगळे संदेश मिळतात. या गोंधळामुळे मळमळ, चक्कर आणि उलटीसारखी लक्षणे दिसू लागतात. लहान मुले, गर्भवती महिला आणि मायग्रेनचा त्रास असलेल्या व्यक्तींमध्ये हा त्रास तुलनेने अधिक दिसून येतो.

मोशन सिकनेसची प्रमुख लक्षणे

  • मळमळ आणि उलटी होणे
  • चक्कर येणे
  • थंड घाम येणे
  • चेहरा फिकट पडणे
  • जास्त लाळ येणे
  • अशक्तपणा किंवा अस्वस्थ वाटणे

प्रवासादरम्यान उलटी टाळण्यासाठी काय करावे?

योग्य जागेची निवड करा

कारमध्ये पुढील सीटवर, बसमध्ये पुढील भागात किंवा विमानात पंखाजवळील सीट निवडल्यास हालचालीचा परिणाम तुलनेने कमी जाणवतो.

दूरच्या स्थिर वस्तूकडे पाहा

मोबाइल किंवा पुस्तकाकडे सतत पाहण्याऐवजी बाहेर किंवा एखाद्या स्थिर वस्तूकडे लक्ष केंद्रित करा. त्यामुळे मेंदूला हालचालीचा अंदाज घेणे सोपे जाते.

हलका आहार घ्या

प्रवासापूर्वी तेलकट, मसालेदार आणि अतिजड अन्न टाळा. हलका व सहज पचणारा आहार घेतल्यास मळमळ कमी होण्यास मदत होते.

ताजी हवा मिळू द्या

वाहनातील खिडकी उघडी ठेवणे किंवा एअर व्हेंटचा वापर केल्यास ताजी हवा मिळते आणि अस्वस्थता कमी होऊ शकते.

आल्याचा उपयोग होऊ शकतो

काही संशोधनांनुसार आले मळमळ कमी करण्यास मदत करू शकते. प्रवासापूर्वी किंवा प्रवासादरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याने आलेयुक्त पेय किंवा आल्याचा चहा किंवा आल्याची कँडी खा.

औषधांची गरज कधी पडते?

जर प्रत्येक प्रवासात तीव्र मळमळ किंवा वारंवार उलट्या होत असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने मोशन सिकनेससाठीची औषधे घेतली जाऊ शकतात. स्वतःहून औषधे घेणे टाळावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Eating Schedule: सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत… जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

Web Title: Motion sickness remedies travel vomiting home remedies health tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • health care news
  • Medicine Strips
  • travel tips

संबंधित बातम्या

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस
1

Jalgaon News: सेवेचा हात, आनंदाची साथ! विशेष मुलांसोबत साजरा केला सामाजिक बांधिलकीचा दिवस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.