Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने
Nana Patekar Passes Away: दमदार अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे कधीच न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी त्यांच्या अभिनयामुळे चाहत्यांना खळखळून हसवले तर कधी रडवले. आजही त्यांचे अनेक डायलॉग चाहत्यांचे तोंड पाठ आहेत. नाना पाटेकरांच्या जाण्यामुळे सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दमदार अभिनय, भारदस्त आवाज आणि संवादफेकीची खास शैली असलेले नाना त्यांच्या डायलॉगमुळे लोकप्रिय झाले. नाना केवळ त्यांच्या अभिनयामुळेच नाहीतर साध्या राहणीमानामुळे सुद्धा ओळखले जायचे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर राहून नानाचे व्यक्तिमत्व खूप साधे होते. मोठ्या पडद्यावर अनेक दमदार भूमिका साकारणारे नाना खऱ्या आयुष्यात अतिशय साधे आणि पारंपरिक पोशाख घालणे पसंत करायचे. नाना पाटेकर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये, मुलाखतींमध्ये किंवा प्रवासादरम्यान अनेक वेळा पांढऱ्या रंगांचा सुती कुर्ता आणि पायजमा किंवा धोती परिधान करायचे. याशिवाय अनेकदा विमानतळावर किंवा अनौपचारिक भेटींमध्ये ते अगदी सैल आणि आरामदायी कपडे परिधान करण्यास जास्त पसंती द्याचे. त्यांच्या खांद्यावर कायमच पांढरा गमछा असायचा. निळा कुर्ता, पांढरा पायजमा आणि पांढरे उपरणं या पारंपरिक कपड्यांमध्येच नाना कायम दिसायचे.
चकचकीत किंवा डिझायनर कपड्यांऐवजी साध्या रंगांना नानांनी कायमच पसंती दर्शवली. नाना पाटेकर त्यांच्या पुण्याजवळील खडकवासला येथील फार्महाऊसवर आपला जास्तीत जास्त वेळ घालावयाचे. ते तिथे जाऊन स्वतः शेती, झाडे लावणे इत्यादी अनेक गोष्टी करायचे. शेतातील काम करताना अत्यंत सामान्य माणसासारखे किंवा एखाद्या शेतकऱ्यासारखे साधे कपडे परिधान करायचे. नाना पाटेकरांची संध्याकाळ पुस्तकांसोबत व्हायची.Nana Patekar Passes Away: रुबाबदार लुक, दमदार व्यक्तिमत्त्व! नाना पाटेकरांनी त्यांच्या पोशाखाने जिंकली होती चाहत्यांची मने






