पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी नॅचरल ड्रिंक!
जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर शरीरात लठ्ठपणा वाढू लागतो. याशिवाय मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. वजन करण्यासाठी अनेक लोक घरगुती पेय पिण्याऐवजी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळता प्रोटीन ड्रिंकचे सेवन करतात. मात्र तरीसुद्धा वाढलेले वजन कमी होत नाही. हानिकारक प्रोटीनशेकचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होते, मात्र आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता अशक्ते. या पेयांच्या सेवनामुळे किडनी निकामी होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. डिटॉक्स ड्रिंक शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जाणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – iStock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर आल्याच्या चहाचे सेवन करावे. आल्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. यासोबतच पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. डिटॉक्स पेय शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुम्ही आल्यासोबतच इतर पदार्थांपासून बनवलेल्या पेयांचे सुद्धा सेवन करू शकता. ही डिटॉक्स पेय शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
वजन कमी करताना इतर कोणत्याही पेयांचे सेवन न करता आल्याच्या चहाचे सेवन करावे. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरात वाढलेली जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात. आल्याचा चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात किसलेले आलं टाकून मिक्स करा. टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर आल्याचा चहा गाळून घ्या आणि त्यात मध टाकून मिक्स करा. तयार केलेला चहा उपाशी पोटी प्यायल्यास पोटावर वाढलेली चरबी लवकर कमी होईल.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याचा चहा प्याल्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा थर कमी होतो. याशिवाय पोट जास्त काळ भरलेले राहते. मात्र आल्याचे जास्त सेवन करू नये. यामुळे पोटात जळजळ वाढून जुलाब किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू शकतात. कंबरेवरील चरबीचा घेर कमी करण्यासाठी आल्याचा चहा गुणकारी आहे. बॉडी मास इंडेक्स, चरबी कमी होण्यास मदत होईल. आल्याचा चहा मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यासाठी मदत करते.
लघवी करताना सतत होणारी जळजळ असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष न करता आरोग्याची घ्या काळजी
आरोग्यासाठी आलं तितके चांगले आहे तितकेच ते वाईट सुद्धा आहे. आल्याचा चहा अतिप्रमाणात प्याल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आल्याचा चहा दिवसभर कितीही वेळा तुम्ही पिऊ शकता.या चहाच्या सेवनामुळे शरीराला आलेली सूज कमी होईल आणि मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होईल.