पावसाळ्यात डेंग्यूची लागण झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणे
राज्यभरात सगळीकडे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या दिवसांमध्ये वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. वातावरण कधी थंड असते, तर कधी वातावरणात आद्र्रता निर्माण होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. देशभरात साथीच्या आजारांची रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या दिवसांमध्ये सतत सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब इत्यादी आजार वाढू लागतात. हे आजार वाढल्यानंतर अजुआबाजूच्या परिसरातील लोकांनासुद्धा साथीच्या आजाराची लागण होते. शरीरात थकवा, अशक्तपणा वाढू लागल्यांस तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.(फोटो सौजन्य – iStock)
किडनीला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच व्हा सावध होऊन घ्या काळजी
सतत बाहेरचे तेलकट किंवा उघड्यावरचे पदार्थ खाल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. पावसाळ्यात डेंग्यूच्या डासांची पैसाद मोठ्या प्रमाणावर होते. डेंग्यू झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत होऊन जाते. शरीरातील पांढऱ्या पेशी डेंग्यू झाल्यानंतर कमी होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डेंग्यू झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? आजारापासून बचाव करण्यासाठी आरोग्याची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डेंग्यू, मलेरिया किंवा कावीळ इत्यादी आजारांची लागण होण्याची शक्यता असते. हे आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे घराच्या आजूबाजूला डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये म्हणून कुठेही पाणी साचून देऊ नका. कुलर, बादली, फुलपात्रे, जुने टायर इत्यादी ठिकाणी पाणी साचू देऊ नका. याशिवाय घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मच्छर चावू नये म्हणून पूर्ण अंगभर कपडे घालावे. यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी लांब आणि अंगभर कपडे घालावेत. कारण संध्याकाळच्या वेळी जास्त मच्छर येतात. डास चावू नये म्हणून दरवाजा, खिडक्यांवर जाळ्या लावून ठेवाव्यात. यामुळे मच्छर घरात येणार नाही.
लिव्हरसाठी दारूचं नाहीतर ‘हे’ पदार्थ सुद्धा ठरतात अतिशय भयानक, शरीरात दिसून येतील गंभीर बदल
निरोगी आरोग्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. या दिवसांमध्ये आहारात हेल्दी आणि शरीरास आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आजारात भाज्या, फळे, ड्रायफ्रूट इत्यादीचे सेवन करावे. यासोबतच शरीराला आवश्यक असलेली पुरेशी झोप घ्यावी. यामुळे तुम्ही कायम फ्रेश आणि निरोगी राहाल.