
नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी 'या' फेसपॅकचा आवर्जून करा वापर
Navratri 2026: शारदीय नवरात्री उत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सगळीकडे आंनद आणि उत्साहाचे वातावरण असते. देवीची पूजा करुन अनेक ठिकाणी दांडिया आणि गरबाचे आयोजन केले जाते. गरब्याला जाताना तरुणी व महिला पारंपरिक पोशाखात चनिया चोलीचा लूक करून सुंदर नटून थटून तयार होतात. गरब्याच्या ४ ते ५ दिवस आधीपासूनच कपडे खरेदीला सुरुवात केली जाते. याशिवाय चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. सुरकुत्या,पिपंल्स, काळे डाग, मुरुम घालवण्यासाठी स्किन केअर रुटीन, आहारात बदल, महागड्या स्किन ट्रीटमेंट करुन त्वचेची काळजी घेतली जाते. पण वांरवांर महागड्या स्किन ट्रीटमेंट करण्याऐवजी किचनमध्ये उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर त्वचेसाठी करावा. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. त्वचेचे सौंदर्य खुलून दिसण्यासाठी महागड्या उत्पादनांचा वापर करण्याची अजिबात आवश्कता नाही. किचनमधील पदार्थ त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारतात. त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी हे फेसपॅक नक्की करा ट्राय. (फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावरील सौंदर्य खुलून दिसण्यासाठी उबटन फेसपॅकचा वापर नक्कीच करा. फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटीमध्ये बेसन, हळद, बदाम पावडर आणि कच्चे दूध घालून सर्व मिश्रण मिक्स करुन घ्या. तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. १५ मिनिट झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्यावर लावल्यास टॅन कमी होण्यास मदत होईल.
काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी, वाटीमध्ये काकडीचा रस घेऊन त्यात संत्र्याचा रस आणि टोमॅटोचा रस, बेसन घालून मिक्स करुन घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावल्यानंतर १० ते १५ मिनिटं ठेवून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करुन घ्या. फेसपॅक थोडा सुकल्यानंतर चेहरा लगेच स्वच्छ करा. टोमॅटोच्या रसामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, टॅन कमी होण्यास मदत होईल. काकडीचा रस त्वचा हायड्रेट करण्यास मदत करेल.
बेसन आणि बटाट्याचा फेस पॅक बनवण्यासाठी, वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस, हळद घालून पेस्ट बनवा. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवून द्या. हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. अर्ध्या तासाने चेहरा पाण्याने धुवून टाका. हा फेसपॅक लावल्यामुळे चेहरा आणि त्वचा अधिक नितळ दिसेल. त्वचेच्या वाढत्या समस्यापासुन सुटका मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा.