
१० रुपयांत चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बेसनमध्ये मिक्स करा 'ही' पांढरी गोष्ट, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार
Skin Care Tips: चेहऱ्यावरील नैसर्गिक तेज वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल, क्लीनअप, डी टॅन इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण कामाच्या धावपळीमध्ये पार्लरमध्ये जाण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. कामाची धावपळ, थकवा, मोबाईल लॅपटॉपवर काम, शरीरात निर्माण झालेला पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे त्वचा निस्तेज होऊन जाते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स, मुरूम आणि काळे डाग घालवण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीम आणि सिरमचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक तेज येते आणि त्वचेच्या समस्या कमी होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
दह्यामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा स्वच्छ करतात. लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील डेड स्किन नष्ट करण्यास मदत करते आणि त्वचा उजळदार करते. चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशींमुळे त्वचा काळी पडून जाते आणि चेहऱ्यावरील ग्लो नाहीसा होतो. त्यामुळे त्वचा कायमच फ्रेश आणि तेजस्वी ठेवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर न करता घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर हळूहळू प्रभाव दिसू लागतो आणि त्वचा आतून उजळदार होण्यास मदत होते.
फेशिअलची सुरुवात करताना सगळ्यात आधी दही घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. मसाज केल्यामुळे त्वचेमधील रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि त्वचा स्वच्छ होते. त्वचेवर साचलेली धूळ, घाण आणि अतिरिक्त तेल निघून जाण्यासाठी दह्याचा वापर करावा. यामुळे त्वचा मोकळा श्वास घेऊ शकते.
त्वचा क्लिजिंग करून झाल्यानंतर वाटीमध्ये दही घेऊन त्यात थोडीशी साखर टाकून मिक्स करा. त्यानंतर चेहऱ्यावर तयार केलेला स्क्रब लावून हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड सक्तीनं नष्ट होण्यास मदत होते. चेहऱ्यावर हलक्या हाताने वर्तुळाकार मसाजकेल्यास त्वचा मऊ होण्यास मदत होते. त्यानंतर पाण्याने किंवा कपड्याने त्वचा पुसून घ्या.
फेसपॅक तयार करताना वाटीमध्ये बेसन, दही, हळद, ग्लिसरीन आणि कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास गुलाबपाणी घालावे. फेसपॅक तयार केल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. जाडसर लेयर सुकल्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर त्वचा स्वच्छ धुवून घ्या. कोणतेही घरगुती फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर त्वचेवर मॉइश्चराइजर लावावे. यामुळे त्वचेवर ओलावा कायम टिकून राहतो.
Ans: बेसनमध्ये दूध किंवा दह्यासारखा त्वचेला अनुकूल घटक मिसळून फेसपॅक तयार करता येतो. हा पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि मृत पेशी स्वच्छ होण्यास मदत होऊ शकते.
Ans: बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल आणि घाण स्वच्छ करण्यास मदत करू शकते. दुधामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेच्या पृष्ठभागावरील मृत पेशी काढण्यास मदत करते.
Ans: बेसनाचा फेसपॅक त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसण्यास मदत करू शकतो. मात्र यामुळे त्वचेचा नैसर्गिक रंग बदलतो किंवा आठवडाभरात गोरेपणा येतो, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.